क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचा तिसरा हंगाम सप्टेंबर महिन्यात पार पडणार आहे. यावेळी स्पर्धेचे आयोजन इंग्लंड देशात होत आहे. खरं तर, आतापर्यंत रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे 2 हंगाम पार पडले आहेत. दोन्ही वेळा भारतीय संघाने यजमानपद भूषवले होते. अशाप्रकारे आता पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन भारताबाहेर होत आहे.
इंग्लंड भूषवणार स्पर्धेचे यजमानपद
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज (Road Safety World Series) स्पर्धेचा हा तिसरा हंगाम आहे. भारताने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या दोन हंगामाचा किताब आपल्या नावावर केला आहे. तसेच, असेही म्हटले जात आहे की, यावेळी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये पाकिस्तान संघही भाग घेणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या आयोजनाला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची (ECB) मंजुरी मिळाली आहे. या स्पर्धेत एकूण 9 संघ चॅम्पियन बनण्यासाठी आमने-सामने असतील. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, भारतीय संघ स्पर्धेचा किताब जिंकतो की नाही.
यावेळी 9 संघ घेणार भाग
खरं तर, या स्पर्धेची सुरुवात 2020मध्ये झाली होती. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये वेगवेगळ्या देशांचे माजी क्रिकेटपटू मैदानावर खेळताना दिसतात. आतापर्यंत या स्पर्धेत 8 संघ खेळत होते. मात्र, आता पाकिस्तान संघही यात सामील झाल्यामुळे, तिसऱ्या हंगामात एकूण 9 संघ खेळताना दिसतील. या स्पर्धेचा पहिला हंगाम कोरोना व्हायरसमुळे 2020मध्ये खेळला गेला नव्हता. त्यानंतर पहिल्या हंगामासाठी 2021ची वाट पाहावी लागली. या स्पर्धेचा दुसरा हंगाम 2022मध्ये खेळला गेला होता. सन 2020मध्ये पहिल्या हंगामात भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघ खेळले होते. मात्र, फक्त 4 सामन्यांनंतर स्पर्धा रोखण्यात आली होती.
सप्टेंबरमध्ये 3 आठवडे खेळली जाणार स्पर्धा
तिसऱ्या हंगामाच्या तारखांची घोषणा अद्याप झाली नाहीये. मात्र, आशा आहे की, स्पर्धा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून 3 आठवडे खेळली जाईल. खरं तर, या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, इरफान पठाण, ड्वेन स्मिथ, केविन पीटरसन, सनथ जयसूर्या, शेन वॉटसन, ब्रेट लीग, तिलकरत्ने दिलशान आणि थिसारा परेरा यांसारख्या वनडे आणि टी20 विश्वचषक विजेत्या खेळाडूंचा समावेश असेल.
Road Safety World Series will be played next month in England. Pakistan team will also be participating. (Espncricinfo). pic.twitter.com/aJIGdnHnp5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 5, 2023
तसेच, ब्रायन लारा, जाँटी ऱ्होड्स, मखाया एन्टिनी, रॉस टेलर आणि इतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी या स्पर्धेत भाग घेतला. ज्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीनंतर याची लोकप्रियता प्रचंड वाढवली आहे. आता पाकिस्तान संघ सामील होत असल्यामुळे या स्पर्धेवर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघाचा सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील. (big news road safety world series will be played next month in england here)
महत्त्वाच्या बातम्या-
भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या ईशांतला ‘या’ धुरंधराने दिला सर्वात जास्त त्रास, स्वत:च सांगितले नाव
जगातील सर्वोत्तम कर्णधार कोण? पाकिस्तानी खेळाडूने बाबर अन् इम्रान नाही, तर ‘या’ भारतीयाचे घेतले नाव