---Advertisement---

आजची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी, रोहित शर्मा क्रिकेटमधून…

On: शनिवार, जानेवारी 4, 2025 8:12 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी दरम्यान भारतीय क्रिकेट संघातून मोठी बातमी समोर येत आहे. जो की रोहित शर्माच्या बाबतीत आहे. वास्तविक सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात नंतर टीम इंडियाचा नियमीत कर्णधार रोहित शर्मानं मोठं विधान केलं आहे. जो की त्याच्या कसोटी कारकिर्दीशी संबधित आहे.

बाॅर्डर गावस्कर मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खराब फाॅर्ममुळे बाहेर बसण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्तव करत आहे. या दरम्यान रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कसोटी कारकिर्दीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला, “बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेल्या लोकांनी ठरवू नये की, मी कधी निवृत्ती घ्यावी. तो माझा निर्णय आहे आणि मी एवढ्यात हा निर्णय घेणार नाही. मी मेहनत घेईन माझ्या कमकुवतपणा वर काम करेन आणि कमबॅक करेन”.

दरम्यान अश्या परिस्थितीत रोहित शर्माने एक गोष्ट मात्र स्पष्ट केलं आहे की, तो इतक्यात कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेणार नाहीये.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली. जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनला बाद करून भारताला दिवसाचे पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मोहम्मद सिराजने एकाच षटकात सॅम कॉन्स्टन्स आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केले. सिडनी कसोटीत 185 धावांत सर्वबाद झाल्यानंतर टीम इंडियाचे हे दमदार पुनरागमन आहे. या बातमीखेरीस ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 विकेट गमावून 119 धावा आहे. सध्या क्रीझवर ब्यू वेबस्टर आणि ॲलेक्स कॅरी खेळत आहेत.

तत्तपूर्वी टीम इंडियाने पहिल्या डावात खेळताना 185 धावा केल्या होत्या. ज्यात रिषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या होत्या. तर गोलंदाजीत स्काॅट बोलंडने 4 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा-

रोहित ‘द ग्रेट लीडर’! ड्रिंक्स ब्रेक दरम्यान हिटमॅनची मैदानात एन्ट्री, संघाचं मनोबल वाढवलं
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियन भूमीवर रचला इतिहास, 47 वर्ष जुना विक्रम मोडला
IND vs AUS; कांगारू फलंदाजांना जसप्रीत बुमराहची भिती, अष्टपैलू खेळाडू स्पष्टच बोलला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---