इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अद्याप अनेक महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, यापूर्वीच काही संघांनी स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. काहींनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स संघाचाही समावेश आहे. लखनऊने आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांनी आपल्या नवीन सपोर्ट स्टाफची घोषणा केली आहे.
सुरुवातीच्या दोन हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचे मुख्य प्रशिक्षकपद अँडी फ्लॉवर यांच्याकडे होते. मात्र, आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेपूर्वी एलएसजी (LSG) संघाने फ्लॉवर यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. फ्लॉवर यांच्या जागी आता ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांच्याकडे संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोपवले आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी लखनऊच्या प्रमुख स्टाफविषयी बोलायचं झालं, तर मागील 2 हंगामाप्रमाणे या आयपीएल 17 (IPL 17) हंगामातही कर्णधारपद केएल राहुल (KL Rahul) याच्याच खांद्यावर असणार आहे. राहुलव्यतिरिक्त गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा संघाचा ग्लोबल मेंटॉर आहे. मध्यंतरी म्हटले जात होते की, गंभीर केकेआर (KKR) या संघाशी जोडला जाऊ शकतो, पण या फक्त अफवा राहिल्या.
S Sriram joins to complete our coaching staff for 2024 💙
Full story 👉 https://t.co/4svdieJytL pic.twitter.com/8EgX2Pg8uP
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) September 9, 2023
लखनऊचे मुख्य प्रशिक्षक आता जस्टीन लँगर आहेत. तसेच, सहाय्यक प्रशिक्षकाच्या रूपात फ्रँचायझीने दोन दिग्गजांना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. यामध्ये श्रीधरन श्रीराम आणि विजय दहिया यांच्या नावाचा समावेश आहे.
आयपीएल 2024साठी फ्रँचायझींनी दक्षिण आफ्रिदेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल याला आपला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. तसेच, फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची धुरा भारताचा देशांतर्गत क्रिकेटपटू प्रवीण तांबे आहे.
आगामी हंगामासाठी लखनऊ संघात दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स याला आपला क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून नेमले आहे. याव्यतिरिक्त स्ट्रॅटेजिक सल्लागार म्हणून एमएसके प्रसाद यांना निवडले आहे.
आयपीएल 2024साठी एलएसजीचा प्रमुख स्टाफ
कर्णधार- केएल राहुल
ग्लोबल मेंटॉर- गौतम गंभीर
मुख्य प्रशिक्षक- जस्टीन लँगर
सहाय्यक प्रशिक्षक- विजय दहिया, एस श्रीराम
क्षेत्ररक्षक प्रशिक्षक- जाँटी ऱ्होड्स
गोलंदाजी प्रशिक्षक- मॉर्ने मॉर्केल
फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक- प्रवीण तांबे
स्ट्रॅटेजिक सल्लागार- एमएसके प्रसाद (big news these 9 staff will give lucknow super giants the title of ipl 2024)
हेही वाचाच-
शाहरुखच्या ‘Jawan’बद्दल रिंकू म्हणाला ‘डिस्टर्ब करू नका…’, तर कार्तिकने केला प्रामाणिक रिव्ह्यू; वाचाच
‘शाहीन आफ्रिदी रोहितच्या डोक्यात…’, सर्वात वेगवान गोलंदाजाने सांगितलं ‘हिटमॅन’च्या बाद होण्याचे कारण