जागतिक दर्जाचा भेदक वेगवान गोलंदाज तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएल 2024 हंगामात खेळताना दिसू शकतो. तो गोलंदाज इतर कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आहे. पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या तयारीसाठी आयपीएल हे एक शानदार व्यासपीठ असू शकते. स्टार्कची निवड झाली, तर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची 2015नंतर ही पहिलीच वेळ असेल. त्याने आयपीएलमध्ये एकूण 27 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून दोन हंगाम खेळणारा स्टार्क नंतर आयपीएलमधून दूर राहिला आहे. मात्र, त्याच्या पुनरागमनाच्या बातमीने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होत आहे.
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याला 2018च्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) याला निवडले होते. मात्र, दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. यानंतर इतर कारणांमुळेही तो या लीगपासून दूर राहिला. स्टार्कने अनेकदा ऑस्ट्रेलिया संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळेही आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.
मात्र, ऑस्ट्रेलियासाठी पुढील वर्षीचे वेळापत्रक फार व्यस्त नसणार आहे. ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषकापूर्वी फक्त न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. तसेच, वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेनंतर अफघाणिस्तान, आयर्लंड आणि इंग्लंड संघांविरुद्ध खेळायचे आहे.
विश्वचषकासाठी असेल चांगली तयारी
स्टार्कने एका क्रिकेट पॉडकास्टशी बोलताना आयपीएलविषयी भाष्य केले. तो म्हणाला, “आता 8 वर्षे उलटली आहेत. मी नक्कीच पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळू इच्छितो. इतर गोष्टींसोबतच ही टी20 विश्वचषकासाठीही चांगली तयारी असेल.”
पुढे बोलताना तो असेही म्हणाला, “हे पाहणे रंजक ठरेल, की कोणी आयपीएलमध्ये मला खरेदी करण्यात रस दाखवेल का? यानंतर टी20 विश्वचषक आहे. त्यामुळे पुढील वर्ष खूपच रोमांचक असू शकते, जे यावर्षीच्या तुलनेत चांगले असेल. त्यामुळे माझ्यासाठी माझे नाव पुढे देण्याची ही चांगली संधी असेल.”
Mitchell Starc said "I am definitely going back to IPL next year". [Willow Talk cricket podcast]
– Starc is coming back…!!!!! pic.twitter.com/RO3lpcqDnv
— Johns. (@CricCrazyJohns) September 7, 2023
स्टार्कला 100व्या कसोटीसाठी राहायचे आहे फिट
स्टार्कचे आयपीएलपासून दूर होण्याचे मोठे कारण हेदेखील होते, की त्याला कसोटी क्रिकेटसाठी पूर्णपणे उपलब्ध राहायचे होते. स्टार्कने आपल्या कारकीर्दीची एक रूपरेषा आखली नाहीये, पण त्याने म्हटले आहे, की त्याला त्याच्या देशासाठी 100 कसोटी सामने खेळायचे आहेत. ग्लेन मॅकग्रा हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाकडून 100 कसोटी सामने खेळले आहेत.
स्टार्कने सध्या 82 कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या कसोटी वेळापत्रकानुसार जायचं म्हटलं, तर त्याचा 100वा कसोटी सामना 2025-26च्या ऍशेस मालिकेदरम्यान असेल. (australia fast bowler mitchell starc planning an ipl return in 2024 t20 world cup planning know here)
हेही वाचाच-
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! जय शाहांकडे मागितले ‘ते’ पैसे, PCB अध्यक्षाची मेलद्वारे मागणी
विश्वचषक संघातून वगळल्यानंतर चहलने घेतला मोठा निर्णय! करियरसाठी महत्वाचे ठरणारे ‘हे’ पाऊल