सध्या क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. मात्र, स्पर्धा सुरू असतानाच एक वाद समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्पर्धेचा यजमान आहे, पण बीसीसीआयने मागील वर्षीच स्पष्ट केले होते, की ते आपला संघ पाकिस्तानात पाठवणार नाहीत. त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने श्रीलंकेला पाकिस्तानसोबत स्पर्धेचा सहयजमान बनवले. यामुळे पाकिस्तानच्या वाट्याला फक्त 4 सामन्यांचे यजमानपद आले, तर श्रीलंकेला सर्वाधिक 9 सामने मिळाले. आता पीसीबी नवीन कारणामुळे चर्चेत आला आहे.
पाकिस्तान क्रिकटे बोर्डाकडून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद उपस्थित केला जातो. आधी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या यजमानपदाबद्दल वाद निर्माण करण्यात आला. मात्र, भारताने आधीच सांगितले होते, की संघ पाकिस्तानात खेळणार नाही. आशियाई क्रिकेट परिषदेने इतर देशांच्या संघाच्या मागणीवर स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानसोबत श्रीलंकेलाही दिले. पीसीबीला हे पटले नाही, पण त्यांच्या हातात काहीच नव्हते.
आता पीसीबी अध्यक्ष जका अश्रफ (Zaka Ashraf) यांनी केलेल्या एका कृतीमुळे, त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पीसीबी अध्यक्षाने एसीसीला भारत विरुद्ध नेपाळ (India vs Nepal) संघात खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री कमी झाल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
असे म्हटले जात आहे, की एसीसी अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्याकडेही पैशांची मागणी करण्यात आली आहे. एसीसीला पीसीबीकडून मेल पाठवण्यात आला आहे, ज्यात तिकिटांच्या कमी विक्रीमुळे झालेली नुकसान भरपाई करण्यास सांगितले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आशिया चषकाचे यजमानपद दिले होते. तसेच, स्पर्धेचा यजमान पाकिस्तानच आहे. मात्र, सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. तरीही तिकीट विक्रीच्या कमाईचा भाग पाकिस्तानला मिळेल. पाकिस्तानचे म्हणणे आहे, की श्रीलंकेत पावसामुळे तिकीट कमी विकले जात आहेत, तर त्यांच्या मायदेशात लाहोर येथील सामन्यातही प्रेक्षक मैदानात येत नाहीयेत. मुल्तानमध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) या सुपर-4 सामन्यालाही प्रेक्षकांची संख्या कमी होती.
सुपर-4मधील पुढील सामना
सुपर-4मधील पहिल सामना बुधवारी (दि. 6 सप्टेंबर) लाहोरमध्ये खेळवण्यात आला, जो पाकिस्तानने 7 विकेट्सने जिंकला. आता या फेरीतील पुढील सामना 9 सप्टेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (big news asia cup 2023 pcb chairman jay shah demanding compensation for loss of revenue due to poor ticket sales in sri lanka read)
हेही वाचाच-
विश्वचषक संघातून वगळल्यानंतर चहलने घेतला मोठा निर्णय! करियरसाठी महत्वाचे ठरणारे ‘हे’ पाऊल
नाद केला पण पुरा केला! 2023मध्ये कर्णधार म्हणून ‘अशी’ जबरदस्त कामगिरी एकट्या रोहितलाच जमली, वाचाच