क्रिकेटप्रेमी ज्याप्रकारे आयपीएल स्पर्धेची वाट पाहत असतात, तशीच वाट आता महिला प्रीमिअर लीग अर्थातच डब्ल्यूपीएल स्पर्धेचीही पाहतात. बीसीसीआयने महिलांच्या स्पर्धेची सुरुवात याच वर्षी मार्चमध्ये केली होती. या स्पर्धेचा पहिला हंगाम यशस्वीरीत्या पार पडला होता. तसेच, जगभरातील अव्वल खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या उद्घाटनाचा हंगाम मुंबईत खेळला गेला होता. या हंगामाचा किताब मुंबई इंडियन्स संघाने हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. आता चाहते या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाची वाट पाहत असतानाच मोठी बातमी समोर येत आहे.
महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League) म्हणजेच डब्ल्यूपीएल 2024 (WPL 2024) स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील सर्व सामन्यांचे आयोजन मुंबई (Mumbai) आणि बंगळुरू (Bangalore) येथे होण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर येत आहे.
असे असले, तरीही अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. वुमेन्स क्रिकझोनच्या रिपोर्टनुसार, डब्ल्यूपीएलच्या पुढील हंगामाचे आयोजन 2024मध्ये होऊ शकते. तसेच, सामने भारतातील दोन प्रमुख शहरे मुंबई आणि बंगळुरूत खेळले जाऊ शकतात.
https://www.instagram.com/p/CzYp_Oltdgu/?igshid=NTNzdGgxeG9ibHNw
खरं तर, काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर येत होत्या की, यावेळी महिला प्रीमिअर लीगचे आयोजन आयपीएल प्रकारात केले जाईल. यामध्ये सर्व संघ घरच्या आणि विरोधी संघाच्या मैदानावर खेळताना दिसतील, पण हे अद्याप निश्चित झाले नाहीये. तरीही रिपोर्ट्सनुसार, यावर्षी 5 संघ भाग घेतील आणि स्पर्धेचा प्रकार पहिल्या हंगामासारखाच असेल. सर्व 5 संघ राऊंड रॉबिन पद्धतीने प्रत्येकी 2 वेळा एकमेकांशी भिडतील. त्यानंतर अव्वल 3 संघ बादफेरीत पोहोचतील. गुणतालिकेत अव्वलस्थानी राहणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघात एलिमिनेटर सामना खेळला जाईल आणि विजयी संघ अंतिम सामन्यात पोहोचेल.
बीसीसीआयने 19 ऑक्टोबर रोजी एक यादीत जाहीर केली होती, ज्यात 5 संघांनी 60 खेळाडूंना रिटेन आणि 29 खेळाडूंना रिलीज केले होते. असे म्हटले जात आहे की, महिला प्रीमिअर लीग 2024 साठी यावर्षीच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात लिलावाचे आयोजन होईल, ज्यात सर्व संघांना आपल्या ताफ्यात नवीन खेळाडूंना घेण्याची संधी मिळेल. अशात आता चाहते डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (big news wpl 2024 next season likely to be played entirely in bengaluru and mumbai from february)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! दिग्गज कॅप्टनने तडकाफडकी केली निवृत्तीची घोषणा, अचानक घेतलेल्या निर्णयाने क्रिकेटविश्वाला धक्का
“शाकिबला दगडाने मारू”, Time Out विकेटनंतर मॅथ्यूजच्या भावाचे धक्कादायक विधान, वाचा सविस्तर