सगळीकडे वनडे विश्वचषक स्पर्धेची धामधूम सुरू असतानाच, वेस्ट इंडीज क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडीजचा अनुभवी फिरकीपटू सुनील नरीन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने 2019 मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सातत्याने संघा बाहेर राहिल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले. तसेच, यापुढे टी20 क्रिकेट खेळत राहू असे देखील त्याने म्हटले.
इंस्टाग्राम पोस्ट करत त्याने ही माहिती दिली. त्याने लिहिले,
“वेस्ट इंडीजसाठी अखेरचा सामना खेळून मला चार वर्षे झाले आहेत. त्यामुळे मी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.”
त्याने यादरम्यान आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले तसेच वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला देखील धन्यवाद म्हटले.
नरीनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 6 कसोटी सामने खेळताना 21 बळी मिळवले. तर वनडे क्रिकेटमध्ये 65 सामने खेळताना त्याच्या नावे 92 बळी आहेत. यासोबतच 51 टी20 सामन्यात 52 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला आहे. वेस्ट इंडीजने 2012 मध्ये जिंकलेल्या टी20 विश्वचषकात त्याची निर्णायक भूमिका राहिली होती. बोर्डाशी सातत्याने झालेल्या वादामुळे त्याने जगभरातील टी20 लीग खेळण्यास प्राधान्य दिले होते.
आयपीएलचा विचार केल्यास तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 2012 पासून भाग आहे. त्याने कोलकाता संघाला 2012 व 2014 मध्ये विजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अजूनही तो कोलकाता संघाचा अभिन्न भाग आहे.
(West Indies Spinner Sunil Narine Annouced Retirement From International Cricket)
हेही वाचा-
अवघ्या आठ डावांमध्ये विराटची मोठी मजल, फक्त सचिन आणि रोहितला जवलेली कामगिरी दाखवली करून
तो आला आणि विक्रम मोडून गेला! श्रेयसने 77 धावांची खेळी करताच सचिनचा ‘तो’ Record उद्ध्वस्त