बंगळुरूमध्ये झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली असून, आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांनी अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की, आरसीबीचे हेड मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्याआधीच बंगळुरू पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना बंगळुरू विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. याशिवाय पोलिसांनी विक्ट्री परेड चे आयोजक डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्राइवेट लिमिटेडच्या स्टाफ मधील तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
याआधी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पोलिसांनी तक्रार नोंदवली होती, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आरसीबी आणि इवेंट मैनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करत पोलीस कमिशनर यांच्यासहित आठ अधिकाऱ्यांना सस्पेंड केले होते याआधी काल कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष पळून गेले होते.
अरेस्ट करण्यात आलेल्या तीन स्टाफच्या डिटेल्स अजून समोर आल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी गुरुवार संध्याकाळी बंगळुरू पोलीस कमिशनर बी दयानंद, ॲडिशनल सीपी, कब्बन पार्क थाना प्रभारी, एसीपी सेंटर डिव्हिजन क्रिकेट स्टेडियमचे प्रमुख, स्टेशन हाऊस मास्टर आणि स्टेशन हाऊस ऑफिसर सुद्धा यामध्ये सामील आहेत.