स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने त्यांच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली होती. पण आता हंगामाच्या मध्यांतरानंतर राजस्थान संघ गुणतालिकेत शेवटून दूसऱ्या स्थानावर आहे. यामागचं कारण म्हणजे, त्यांची खराब रणनिती आणि संघातील स्टार खेळाडूंच्या क्षमतेचा योग्य वापर न करुन घेणे.
फिनिशर बेन स्टोक्सला बनवलंय सलामीवीर
राजस्थान संघाकडे जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशरमध्ये गणला जाणारा बेन स्टोक्ससारखा खेळाडू उपलब्ध आहे. मात्र राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ गेल्या ३ सामन्यांपासून स्टोक्सला सलामीला फलंदाजीसाठी पाठवत आहे. त्यामुळे स्टोक्सला या हंगामात आतापर्यंत एकदाही अर्धशतकीय खेळी करता आलेली नाही. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५ धावा, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४१ धावा आणि नुकत्याच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात १९ धावा केल्या आहेत.
जर स्टोक्सच्या फलंदाजी क्षमतेनुसार त्याला अंतिम षटकात फलंदाजी करायला पाठवले, तर तो नक्कीच षटकार-चौकारांचा पाऊस पाडत सामन्याचा कायपालट करु शकतो.
सलामीवीर बटलरला दिलंय मधल्या फळीत स्थान
जोस बटलरविषयी बोलायचं झालं तर, तो टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट विस्फोटक सलामीवीर फलंदाजापैकी एक आहे. मात्र राजस्थानने बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात त्याला वरच्या फळीत संधी न देता मधल्या फळीत ५व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. त्यामुळे तो २५ चेंडूत केवळ २४ धावांवर बाद झाला.
यावरुन एक गोष्ट लक्षात येते की, राजस्थान संघाच्या खराब रणनितीमुळे स्टोक्स आणि बटलरसारखे स्टार खेळाडू फ्लॉप ठरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या दिग्गजांकडून ‘अर्जुन’ घेतोय गोलंदाजीचे धडे
‘जडेजा-रैनानंतर हाच भारताचा सर्वोत्कृष्ट फिल्डर?’ आरसीबीच्या अहमदचा झेल पाहून चाहत्याची प्रतिक्रिया
“पुन्हा कधीच अशी चूक होता कामा नये,” मुंबईच्या स्टार फलंदाजाला प्रशिक्षकाने फटकारले
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…