---Advertisement---

IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या दिग्गजांकडून ‘अर्जुन’ घेतोय गोलंदाजीचे धडे

On: शनिवार, ऑक्टोबर 17, 2020 7:15 PM
---Advertisement---

दुबई। आयपीएल २०२०चा ३२ वा सामना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) दुबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना मुंबईने ८ विकेट्सने जिंकला. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही गॅलेरीमध्ये दिसला. तो आयपीएलच्या १३ व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाच्या नेट- गोलंदाजी युनिटचा भाग आहे. त्यामुळे तो संघासोबत युएईत उपस्थित आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबतीत माहिती असणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, “अर्जुन मागील ३ महिन्यांपासून मुंबई संघासोबत काम करत आहे. तो नेट्समध्ये खेळाडूंना गोलंदाजी करत आहे. सोबतच प्रशिक्षक शेन बॉण्ड आणि झहीर खानच्या देखरेखीखाली तो आपल्या खेळावर काम करत आहे.”

सूत्रांनी हेही सांगितले की, तो खूप शिस्तबद्ध आहे. त्याला कोचिंग स्टाफकडून प्रशिक्षणासोबतच जगातील सर्वोत्तम फलंदाजांना गोलंदाजी करत अधिक शिकायचे आहे.

यापूर्वी अर्जुन मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसला होता.

https://twitter.com/rdchahar1/status/1305498860815634434

मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना होणार रविवारी

कोलकाताविरुद्ध डी कॉकने नाबाद ७८ धावांची खेळी केली आणि रोहितसोबत ९४ धावांची भागीदारी रचली. यानंतर रोहित म्हणाला की, डी कॉकसोबत फलंदाजी करायला आवडते.

मुंबई संघ आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांपैकी ६ सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. संघाचा पुढील सामना रविवारी (१८ ऑक्टोबर) दुबई येथे किंग्स इलेव्हन पंजाब संंघाविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर खेळू शकतो या संघाकडून

-अनेकांचा आदर्श सचिन, पण खुद्द सचिनचा आदर्श कोण?

-दया कुछ तो गडबड है! गुगलने शोधला सचिन तेंडुलकरचा ‘जावई’

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

-आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---