दोनवेळा आयपीएल विजेता संघ कोलकाता नाइट रायडर्सच्या आयपीएलच्या या हंगामात कामगिरीमध्ये चढउतार पाहायला मिळाला. काही सामने अगदी थोड्या फरकाने जिंकले आहेत तर काही हातातील सामने गमावलेही आहेत. कोलकाताने आतापर्यंत 7 पैकी ४ सामने जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत.
या हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी शुबमन गिल, वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी आणि राहुल त्रिपाठी या युवा खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच असेही काही खेळाडू आहेत जे या हंगामात आतापर्यंत चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स सध्या गुणतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर असला, तरी संघात काही कमकुवतपणादेखील आहे. ज्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. चला जाणून घेऊया केकेआरच्या त्या ३ प्रमुख कमकुवत बाजू कोणत्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सच्या ३ प्रमुख कमकुवत बाजू ज्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे
३. फलंदाजी क्रमवारीत सातत्याने बदल
कोलकाता नाईट रायडर्सकडून या हंगामातील काही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, पण क्रमवारीत सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे कदाचीत फलंदाजांना आपली भूमीका समजून घेताना गोंधळ होत आहे, असे वाटते. तसेच ओएन मॉर्गन, नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांनी एक-दोन सामन्यात चांगली कामगिरी केली आहे पण बाकी सामन्यांमध्ये गरज असताना फलंदाज फ्लॉप झाले आहेत. या गोष्टीवर केकेआरकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे.
या स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे आणि आता कोलकाता नाईट रायडर्सला आणखी कठीण आव्हाने मिळतील. अशा परिस्थितीत, त्यांनी या गोष्टीवर कार्य करणे आवश्यक आहे.
२. पॅट कमिन्स अपयशी
कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्सला १५.५० कोटी रुपयांच्या महागड्या बोलीवर खरेदी केली. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. तथापि, कमिन्सची कामगिरी अद्याप चांगली राहिली नाही. या मोसमात आतापर्यंत त्याने ७ सामन्यांत केवळ २ विकेट घेतल्या आहेत. कमिन्स हा केकेआरचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याने विकेट न घेतल्यास संघाला नक्कीच अडचणींचा सामना करावा लागतो.
१.आंद्रे रसेलचा खराब फॉर्म
अष्टपैलू आंद्रे रसेलची वाईट कामगिरी देखील या हंगामात केकेआरची सर्वात मोठी कमजोरी ठरली आहे. आंद्रे रसेल हा मॅच विनर खेळाडू आहे. मागील हंगामातही त्याने अनेक जबरदस्त खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला होता. तथापि, जर या हंगामात आंद्रे रसेलच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ७ सामन्यांत १८ च्या सरासरीने केवळ ७३ धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत त्याने फक्त २ विकेट घेतल्या आहेत. नक्कीच कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलच्या या कामगिरीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार
व्हिडिओ : ‘नाश्त्यात नशीब खाऊन आला आहात’ स्वतःच्याच फलंदाजीवर क्रिकेटपटूने केले समालोचन
रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे राग आला होता, दिनेश कार्तिकने केला खुलासा
ट्रेेंडिंग लेख –
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण
IPL 2020 : अफाट कौशल्याने परिपूर्ण असलेले ४ खेळाडू, ज्यांना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही