---Advertisement---

मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार

---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाचा दिनेश कार्तिकने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ओएन मॉर्गन कोलकाताचा नवीन कर्णधार असेल. याबद्दल शुक्रवारी(१६ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स संघाने माहिती दिली आहे. कार्तिक २०१८ च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करत होता.

कोलकाताने आयपीएलच्या १३ व्या हंगामात आत्तापर्यंत कार्तिकच्या नेतृत्वाखाली ७ सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या ७ सामन्यांनंतर कार्तिकने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नेतृत्वाची जबाबदारी कोलकाताने विश्वचषक विजेता इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनवर सोपवली आहे.

याबद्दल कोलकाताचे सीइओ वेंकी म्हैसूर यांनी म्हटले आहे की ‘कार्तिकसारखा कर्णधार लाभणे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. असा काही निर्णय घेण्यासाठी मोठे धैर्य लागते, जे त्याने दाखवले. आम्हीही त्याच्या निर्णयाने आश्चर्यचकीत झालो आहोत, पण आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो. २०१९ विश्वचषक विजेता कर्णधार ओएन मॉर्गन, जो कोलकाताचा उपकर्णधार होता, तो आता संघाचे नेतृत्व करणार असल्यानेही आम्ही आनंदी आहोत. कार्तिक आणि मॉर्गन यांनी या स्पर्धेत एकत्र चांगले काम केले आहे. आम्हाला आशा आहे की हा बदल आमच्यासाठी योग्य ठरेल.’

https://twitter.com/KKRiders/status/1317017834590011393

मॉर्गनला आयपीएल २०२० च्या खेळाडूंच्या लिलावादरम्यान कोलकाताने ५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने या हंगामात ७ सामन्यात १७५ धावा केल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून अनेक क्रिकेट जाणकारांनी मॉर्गनला कोलकाताचा कर्णधार करण्यात यावे असे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

-आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून तू दिनेश कार्तिकला स्वेच्छेने सूचना देतो का? मॉर्गनने दिले ‘हे’ उत्तर

-नको रे बाबा! ‘कोलकाता संघातील खेळाडूंसोबत फलंदाजी करणे…’ मॉर्गनने दिली प्रतिक्रिया

व्हिडिओ : ‘नाश्त्यात नशीब खाऊन आला आहात’ स्वतःच्याच फलंदाजीवर क्रिकेटपटूने केले समालोचन

ट्रेंडिंग लेख –

-…आणि त्या षटकाराने दिनेश कार्तिक हिट झाला!

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक

-टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---