---Advertisement---

IPL 2020 : अफाट कौशल्याने परिपूर्ण असलेले ४ खेळाडू, ज्यांना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी

On: शुक्रवार, ऑक्टोबर 16, 2020 11:39 AM
---Advertisement---

नवी दिल्ली | आयपीएलचा 2020 चा अर्धा हंगाम संपला असून आतापर्यंत बर्‍याच तरुण खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे. भारताचा 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार प्रियम गर्ग, जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू अब्दुल समद, वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी, फिरकीपटू रवी बिश्नोई यांचा यामध्ये समावेश आहे. तथापि, असे काही युवा प्रतिभावंत खेळाडू आहेत जे अद्यापही बाकावरच बसले आहेत. हे खेळाडू त्यांच्या कामगिरीने सामन्याचे चित्र बदलू शकतात. चला अशा 4 युवा खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांना या हंगामात अद्यापही संधी मिळाली नाही.

4. इशान पोरेल –

भारताचा 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इशान पोरेलला किंग्स इलेव्हन पंजाबने एकाही सामन्यात संधी दिली नाही. इशान पोरेलने बंगाल रणजी संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 16 बळीही घेतले आहेत. 2018-20 मध्ये रणजी करंडक स्पर्धेत पोररेलने 6 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या असूनही पंजाबने या वेगवान गोलंदाजाला अंतिम 11 जणांच्या संघात स्थान दिले नाही. पोरेलचा गोलंदाजीचा वेग ताशी 140 किमी आहे. जर पंजाबने पोरेलला संधी दिली तर तो त्याच्या कामगिरीने संघाला सामना जिंकून देऊ शकतो.

3. टॉम बंटन

इंग्लंडचा सलामीवीर टॉम बंटनला कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. बंटन हा एक आक्रमक सलामीवीर आहे ज्याने मागील वर्षी झालेल्या टी20 ब्लास्ट स्पर्धेत 549 धावा फटकावल्या, त्यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 161 पेक्षा जास्त होता. बंटनने 51 चेंडूत शतक ठोकले होते. त्यानंतर त्याने बिग बॅश लीगमध्येही तुफान फटकेबाजी केली. पण कोलकाता नाईट रायडर्सने अद्यापही बंटनला अंतिम 11 जणांच्या संघात संधी दिली नाही.

2. मयंक मार्कंडे

पटियालाचा 22 वर्षीय फिरकीपटू मयंक मार्कंडे या हंगामात राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. 2018 च्या आयपीएलमध्ये 15 बळी घेणाऱ्या मयंकला आतापर्यंत राजस्थानकडून एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. वास्तविक राजस्थानमध्ये फिरकीपटू श्रेयस गोपाल आहे पण त्याने काही खास कामगिरी केलेली नाही. अशा परिस्थितीत राजस्थान मयंकला संधी देतो का हे पाहावं लागेल.

1. विराट सिंग

झारखंडचा फलंदाज विराटसिंग सनरायझर्स हैदराबाद संघात आहे, पण या 22 वर्षीय खेळाडूला अद्यापही आयपीएल संधी मिळालेली नाही. विराट सिंग हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विराटने आपल्या फलंदाजीने सर्वांचीच मने जिंकली होती. हैदराबाद विराटला कधी संधी देतो हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

महान फिरकीपटू मुरलीधरनचा बायोपिक वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण

विराट पाजी तुस्सी छा गए! कोहलीने केला कुणालाही न जमलेला विक्रम

‘विराट- डिविलियर्सला आयपीएलने बॅन करावे’, पंजाबच्या धडाकेबाज खेळाडूचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख –

नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही

काळा डाग! ‘आयपीएल’ इतिहासातील पाच घटना ज्यामुळे स्पर्धेची जगात बदनामी झाली

आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---