भारतात दिग्गज क्रिकेटपटूंच्या मुलांचीही नेहमीच चर्चा होत असते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही देखील मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. याचे कारण म्हणजे तिचे नाव हे कोलकाता संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिलसोबत जोडले जात आहे.
सोशल मीडियावर युझर्स याबाबत खमंग चर्चा करताना दिसत आहे. आणि आता तर चक्क गुगलने देखील तिला थेट शुबमन गिलची पत्नी असे म्हटल्याने सगळेच अवाक् झाले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे, ते आपण सविस्तर पाहुयात.
गुगलवर शोधलं शबमन गिलची पत्नी आणि उत्तर आलं…
खरं तर २१ वर्षीय शुबमन गिल हा सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. त्याचे अजूनही लग्न झालेले नाही. पण गुगलवर शुबमन गिलची पत्नी (शुबमन गिल वाईफ) असे सर्च केल्यावर सारा तेंडुलकरचे नाव येत आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, असे का होत आहे? पण यामागे कदाचीत शुबमन आणि सारा डेटिंग करत असलेल्या चर्चा हे मुख्य कारण असल्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप शुबमन किंवा साराने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच सचिन तेंडुलकरनेही यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
सारा आणि शुबमन डेटिंग करत असल्याच्या अनेकदा चर्चा…
मागील अनेक दिवसांपासून साराचे नाव शुबमनशी जोडले जात आहे. यामागे अनेक कारणे आहेत. साराने याआधी शुबमनच्या पोस्टवर कमेंट केल्याने या दोघांबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर त्या दोघांनीही एकाच दिवशी एकच कॅप्शन असलेले आपापले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
साराची इस्टा स्टोरी अन् नेटकऱ्यांना आयतं खाद्य…
काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर कोलकाताच्या सामन्यातील एक व्हिडिओ ठेवला होता. ज्यात युवा फलंदाज शुबमन गिल क्षेत्ररक्षण करताना दिसत होता. तसेच या व्हिडिओला तिने हार्टच्या इमोजीही ठेवली होती. या पोस्टमुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधान आले होते.
काही दिवसांपूर्वीच गुगलने केली होती अशीच चूक…
गुगलने काही दिवसांपूर्वीच अशीच एक चुक केल्याचे निदर्शनास आलं होतं. अफगानिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानची पत्नी असे शोधल्यानंतर तिथे अनुष्काचे नाव येत असल्याचे समोर येत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला होता की, नक्की गुगलवर अशी चुकीची माहिती का दिसत आहे?
गुगलच्या चुकीमागचं कारण बहुदा हेच…
खरंतर २०१८ साली इंस्टाग्रामवरील एका गप्पांच्या सत्रात राशिदला प्रश्न विचारण्यात आला होता की, त्याची आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण आहे?. यावर उत्तर देताना राशिदने अनुष्का आणि प्रिती झिंटाचे नाव घेतले होते. त्यामुळे सोशल मीडियावर राशिद आणि अनुष्काची जोरदार चर्चा होऊ लागली होती. तेव्हापासून गूगलवर राशिदची पत्नी असे सर्च केल्यानंतर अनुष्काचे नाव येऊ लागले. विशेष म्हणजे राशिदचे अजून लग्न झालेले नाही. तसेच अनुष्का ही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आहे.
त्यामुळे कदाचित असाच प्रकार सारा आणि शुबमन यांच्या बाबतीत देखील झाला असण्याची शक्यता आहे.
वाचा- हाच होणार सचिन तेंडुलकरचा जावई? पाहा कोणासोबत जोडलं जातंय साराचं नाव
–वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट, मग काय झालं नक्कीच पाहा
–सारा तेंडूलकर व शुबमन गिलच्या इंस्टा पोस्टचा कॅप्शन सारखाच, दोघेही होताय सोशल मीडियावर ट्रोल
–का झाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगी सारासाठी भावूक?