ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करत नव्हता. पण मंगळवारी (22 नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने शतक केले. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-0 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सलामीवीर वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. तब्बल 1000 दिवसांच्या अंतराने चाहत्यांना वॉर्नरचे शतक पाहायला मिळाले.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सच्या नुकसानावर 355 धावा केल्या. डेविड वॉर्नर (David Warner) एकूण 102 चेंडू खेळला आणि 106 धावा केल्या. यादरम्यान वॉर्नरच्या बॅटमधून 8 चौकार आणि 2 षटकार निघाल्याचे पाहायला मिळाले. तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सरामीवीर ट्रेविस हेड यांने 130 चेंडूत 152 धावा केल्या. या धावा करण्यासाठी हेटने 16 चौकार आणि 4 षटकार मारले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 269 धावांची मोठी भागीदारी पार पाडली. मागच्या 1043 दिवसांमध्ये वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेले हे पहिलेच षटक आहे, त्यामुळे याचे महत्व अधिकच वाढले.
यादरम्यान, या शतकानंंतर डेविड वॉर्ननने एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या 6000 धावा केल्या. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 141 एकदिवसीय सामन्यांपैकी 139 वेळा फलंदाजी केली. यामध्ये 45 च्या सरासरीने 19 शतक आणि 27 अर्धशतकांच्या मदतीने 6007 धावा केल्या आहेत. म्हणजेच त्याने एखूण 46 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा मोठी धावसंख्या केली आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 95 चा राहिला आहे.
मंगळवारच्या शतकानंतर तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्यांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने माजी दिग्गज मार्क वॉ याला मागे सोडले आहे. वॉ याने 244 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 शतके केली होती, आता वॉर्नर 19 शतकांसह यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे आता फक्त एकटा रिकी पॉंटिंग आहे. पॉंटिंगने ऑस्ट्रेलियासाठी एकूण 374 एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 29 शतकांसह 13589 धावा केल्या आहेत.
दरम्यान, उभय संघांतील या एकदिवसीय सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतरही चांगले प्रदर्शन केले. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणारा इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या धावांवर लगाम लावू शकला नाही. ओली स्टोन याने चार विकेट्स घेतल्या, पण यासाठी तब्बल 85 धावाही खर्च केल्या. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट होता 8.50. वॉर्नर आणि हेडव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासाठी एकाही फलंदाजाने अर्धशतक केले नाही. (Big record for Warner after waiting for a thousand days, loss to veteran Mark Waugh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भले-भले आले, पण ‘ही’ कामगिरी फक्त भारतालाच जमली, अर्शदीप-सिराजच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे केलं साध्य
इंग्लंडने काढले पाकिस्तानचे वाभाडे! कसोटी मालिकेसाठी ‘पर्सनल शेफ’ला घेऊन जाणार सोबत