भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतच्या बंदीचा कालावधी कमी केला आहे. आता त्याच्यावर केवळ 7 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
त्याच्या निलंबनाचे 6 वर्षे आधीच पूर्ण झाले असल्याने आता 13 सप्टेंबर 2020 ला त्याच्या बंदीच्या 7 वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यामुळे तो सप्टेंबर 2020 नंतर पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकतो.
बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी श्रीसंतच्या बंदीचा कालावधी पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये समाप्त होईल असे सांगितले आहे.
श्रीसंतवरील बंदीचा कालावधी कमी करण्याबाबत जैन म्हणाले, ‘श्रीसंतने त्याच्या वयाची पस्तीशी ओलांडली आहे. क्रिकेटपटू म्हणून त्याचा सर्वोत्तम काळ निघून गेला आहे. मला वाटते की श्रीसंतवर कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये आणि बीसीसीआयच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्यासाठीची बंदी 7 वर्षांची करणे योग्य वाटत आहे.’
श्रीसंतवर बीसीसीआयने 2013 च्या आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी घातली होती. त्याच्याबरोबरच अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती.
पण यानंतर मार्च 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अनुशासन समीतीला त्यांचा निर्णय बदलण्यास सांगितला होता.
36 वर्षीय श्रीसंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 कसोटी, 53 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. तसेच त्याने कसोटीत 87 विकेट्स, वनडेत 75 विकेट्स आणि टी20मध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली या भारतीय मुलीबरोबर अडकला लग्नबंधनात
–…म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जर्सीच्या कॉलरवर आहे हे सोनेरी फुल, जाणून घ्या कारण
–श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत विलियम्सन नाही तर हा खेळाडू करणार न्यूझीलंडचे नेतृत्व






