Loading...

श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत विलियम्सन नाही तर हा खेळाडू करणार न्यूझीलंडचे नेतृत्व

1 सप्टेंबरपासून श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 14 जणांच्या संघाची घोषणा केली आहे.

या मालिकेसाठी न्यूझीलंडने नियमित कर्णधार केन विलियम्सनला आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला विश्रांती दिली आहे. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडचे प्रभारी नेतृत्व वेगवान गोलंदाज टिम साऊथीकडे सोपवले आहे.

साऊथीने याआधी तीन टी20 सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. या तीन्ही सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

Loading...

तसेच श्रीलंकाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघात इश सोधी, मिशेल सँटेनर आणि टॉड ऍस्टलचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच या संघात मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, डॅरिल मिशेल, टॉम ब्रुस आणि रॉस टेलर या फलंदाजांचा समावेश आहे. तर कॉलिन डी ग्रँडहोम हा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे.

असा श्रीलंका विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ- 

टिम साऊथी (कर्णधार), टॉड ऍस्टल, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रँडहॉम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, स्कॉट कुगेलीइझीन, डॅरिल मिशेल, कॉलिन मुनरो, सेठ रान्स, मिशेल सॅंटनर, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), इश सोधी, रॉस टेलर.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ, हा अनुभवी खेळाडू सामन्यातून बाहेर

या कारणामुळे केन विलियम्सन, अकिला धनंजया सापडले अडचणीत, आयसीसी घेणार निर्णय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हे दोन खेळाडू करणार टीम इंडीयाचे नेतृत्व

You might also like
Loading...