Loading...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हे दोन खेळाडू करणार टीम इंडीयाचे नेतृत्व

29 ऑगस्टपासून भारत अ संघाची दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारत अ संघाचे नेतृत्व मनिष पांडेकडे देण्यात आले आहे. तर चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे देण्यात आले आहे.

या पाचही सामन्यांसाठी शुबमन गिल, विजय शंकर, अनमोलप्रीत सिंग, रिकी भूई, शार्दुल ठाकूर आणि नितीश राणा यांना भारत अ संघात संधी मिळाली आहे.

तसेच यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला पांडे कर्णधार असलेल्या पहिल्या तीन सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. तर संजू सॅमसनला अय्यर कर्णधार असलेल्या चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचीही पहिल्या तीन सामन्यांसाठी भारत अ संघात निवड झाली आहे.

हे सर्व पाच वनडे सामने तिरुअनंतपुरमला द स्पोर्ट्स हब येथे अनुक्रमे 29, 31 ऑगस्ट, 2,4 आणि 6 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहेत.

Loading...

दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध वनडे मालिकेसाठी असा आहे भारत अ संघ – 

पहिल्या तीन सामन्यांसाठी – मनीष पांडे (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, ईशान किशन (यष्टीरक्षक), विजय शंकर, शिवम दुबे, कृणाल पंड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, खलील अहमद, नितीश राणा.

Loading...

चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी – श्रेयस अय्यर (कर्णधार), शुबमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, विजय शंकर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चाहर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, ईशान पोरेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी- ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या ऍशेस सामन्यातून बाहेर

विराट कोहलीचे अव्वल स्थान धोक्यात; स्टिव्ह स्मिथची क्रमवारीत मोठी झेप

कसोटी संघाचा भाग नसतानाही नवदीप सैनी या कारणामुळे असणार टीम इंडियाबरोबर

Loading...
You might also like
Loading...