---Advertisement---

मोठी बातमी- ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या ऍशेस सामन्यातून बाहेर

---Advertisement---

लीड्स। ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या ऍशेस कसोटीतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तो लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या ऍशेस कसोटीत जोफ्रा आर्चरचा चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त झाला आहे.

त्याला शनिवारी(17 ऑगस्ट) लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात 152 चेंडूत 80 धावांवर फलंदाजी करत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेच्या जवळ लागला.

त्यामुळे स्मिथला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. पण नंतर तो एक विकेट गेल्यानंतर पुन्हा फलंदाजीला आला. मात्र तो 92 धावांवर बाद झाला. त्यानंतर तो पाचव्या दिवशी मैदानात उतरला नाही.

आता 22 ऑगस्टपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठीही तो उपलब्ध नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्पष्ट रेले आहे. स्मिथ मंगळवारी(20 ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया संघाच्या सराव सत्रातही सहभागी झाला नव्हता.

स्मिथने या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात 142 आणि 144 धावांची शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात तो 92 धावावर बाद झाला. तसेच दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात तो दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही.

त्याच्याऐवजी आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे फलंदाज मार्नस लाब्यूशानेची ऑस्ट्रेलियाने चालू सामन्यात बदली खेळाडू म्हणून निवड केली. लाब्यूशानेनेही त्याची निवड योग्य ठरवत दुसऱ्या डावात 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना अनिर्णित राखण्यात मदत झाली.

या ऍशेस मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यातील विजयामुळे 1-0 अशी आघाडीवर आहे.

https://twitter.com/ICC/status/1163750776143011840

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीचे अव्वल स्थान धोक्यात; स्टिव्ह स्मिथची क्रमवारीत मोठी झेप

कसोटी संघाचा भाग नसतानाही नवदीप सैनी या कारणामुळे असणार टीम इंडियाबरोबर

धोनीच्या निवृत्तीवर तो क्रिकेटर म्हणतो, टीम इंडिया कुणाची पर्सनल प्राॅपर्टी नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment