Loading...

धोनीच्या निवृत्तीवर तो क्रिकेटर म्हणतो, टीम इंडिया कुणाची पर्सनल प्राॅपर्टी नाही

मागील अनेक दिवसांपासून एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत आहेत. याबद्दल अनेक दिग्गजांनाही आपली मते व्यक्त केली आहे. धोनी त्याचा शेवटचा सामना 2019 विश्वचषकात खेळला असून त्यानंतर त्याने क्रिकेटमधून 2 महिन्यांची विश्रांती घेतली आहे. त्याने या दरम्यान भारतीय सैन्याच्या सेवेत जण्याचा निर्णय घेतला होता.

2019 विश्वचषकादरम्यान धोनीवर संथ फलंदाजीमुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता धोनीच्या निवृत्तीबद्दल बंगालचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने त्याची मते व्यक्त केली आहेत.

तो इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ‘धोनीने आपल्या देशासाठी खूप काही केले आहे. त्याने संघात खूप योगदान दिले आहे. नुकतेच सचिन तेंडुलकरनेही म्हटले होते की धोनीने आता बाजूला होण्याची वेळ झाली आहे. त्याने खूप खेळले आहे.’

‘जरी विराट कोहली आणि आणि संघाला त्याची गरज असली तरी मला वाटते निवड समीतीने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. आत्ता धैर्य दाखवून पुढील पाऊल उचलणे गरजेचे आहे.’

पुढे तिवारी म्हणाला, ‘धोनीची कामगिरी खालावत आहे. ही कामगिरी फक्त एक किंवा दोन डाव असती तर मी असे म्हणालो नसतो. पण एक सर्वोत्तम संघ मैदानात उतरावा लागतो. जे कामगिरी चांगली करतात, ते संघात राहतात आणि जे चांगली कामगिरी करत नाही, ते संघाबाहेर असतात.’

Loading...

‘मला माहित नाही निवड समीती धोनीला त्याच्या भूतकाळाकडे पाहुन संधी देत आहे का. आपल्या देशात अनेक प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना संधी मिळायला हवी. भारतीय संघ ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. हा देशाचा संघ आहे आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

तिसऱ्या कसोटीत स्मिथच्या समावेशाबद्दल ही आहे मोठी बातमी

टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठी झालेल्या मुलाखतीत तो प्रश्न विचारलाच

आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सध्या कुणाचे किती आहेत गुण?

You might also like
Loading...