अफगाणिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी अफगाणिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानच्या यशाचा सर्वात मोठा मंत्र त्यांनी सांगितला आहे. जोनाथन ट्रॉटच्या मते, अफगाणिस्तानचा संघ कोणता संघ समोर आहे याकडे लक्ष देत नाही, ते फक्त आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतात.
विश्वचषक 2023 च्या 34 व्या सामन्यात नेदरलँड्सचा अफगाणिस्तानने 111 चेंडू बाकी असताना 7 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सचा संघ 46.3 षटकांत केवळ 179 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 31.3 षटकांत केवळ 3 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने 28 धावात 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या विजयानंतर अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा आहेत. अफगाणिस्तान 7 सामन्यांत 4 विजय मिळवून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. उर्वरित दोन सामने जिंकल्यास ते उपांत्य फेरीतही पोहोचू शकतील.
सामना संपल्यानंतर प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट (Jonathan Trott) पत्रकार परिषदेसाठी आला आणि यादरम्यान त्यानी संघाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली. जोनाथन ट्रॉट म्हणाला, “आपल्याला कोणता संघ पुढे आहे हे पाहावे लागते आणि त्यानुसार तयारी करावी लागते. परंतू, आमच्यासाठी गोष्ट अशी आहे की, आम्ही फक्त आमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो. कोणता संघ समोर आहे याची आम्हाला पर्वा नाही. आमचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे आणि त्या सामन्यातही आम्ही याच मानसिकतेने मैदानात उतरू.”
जर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पुढचा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत जाण्याच्या खूप जवळ जातील. अफगानिस्तानने या विश्वचषकात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत त्यातील 4 सामने त्यांनी जिंकले आहेत. 8 गुणांसह ते गुणतालिकेत 5व्या स्थानी आहेत. (Big statement from Afghanistan head coach Jonathan Trott said Which team is next)
म्हत्वाच्या बातम्या
AUSvENG: प्रतिष्ठेच्या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तानवर भारी पडला रचिन! झळकावले विश्वचषकातील तिसरे शतक, 23 व्या वर्षीच…