कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने रिंकू सिंग याचे खूप कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत रिंकू सिंगने ज्याप्रकारे कामगिरी केली त्यामुळे आंद्रे रसेल खूप खूश आहे. या मालिकेत रिंकू सिंग ज्याप्रकारे खेळला आहे, त्याचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, कारण त्याच्यात अशी क्षमता आहे, असे तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात रिंकू सिंग (Rinku Singh) याने चांगली फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. खालच्या क्रमांकावर येताना त्याने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. यानंतर दुसऱ्या टी20 सामन्यातही त्याने केवळ 9 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या.
दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं विधान; म्हणाला, ‘मी फक्त रिंकूसाठी…’
रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल (Andre Russell) आयपीएलमध्ये केकेआरकडून एकत्र खेळतात. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रसेल म्हणाला, “रिंकू सिंग करत असलेल्या कामाचे मला आश्चर्य वाटत नाही. तो काही वर्षांपूर्वी केकेआरमध्ये सामील झाला आणि जेव्हा तो सराव सामन्यात किंवा नेटमध्ये फलंदाजी करतो तेव्हा आम्हाला त्याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता दिसली. मात्र, संधी मिळाल्यावर त्याने सातत्याने आयपीएलसारख्या मोठ्या टप्प्यांवर सामने संपवले. यामुळे त्याला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला. मी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया मालिका पाहत आहे आणि जर मला ती लाईव्ह पाहता आली नाही तर मी हायलाइट्स पाहतो आणि तेही फक्त रिंकू सिंगसाठी.”
आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) यानेही रिंकू सिंगचे खूप कौतुक केले आहे. तो म्हणाला की, “रिंकू सिंग टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी खूप उपयुक्त खेळाडू आहे. केवळ फलंदाजी करतानाच नव्हे तर क्षेत्ररक्षण करतानाही तो ज्या प्रकारे मेहनत घेतो त्यावरून तो खूप शक्तिशाली व्यक्ती असल्याचे दिसून येते.” (Big statement of the legendary cricketer SaidI only for Rinku)
महत्वाच्या बातम्या
साई सुदर्शनची Team India मध्ये एन्ट्री होताच अश्विनला पराकोटीचा आनंद; म्हणाला, ‘या पोराने कुठलीच…’
कसोटी-टी20 संघात संधी न मिळालेल्या चहलचे लक्षवेधी ट्वीट, फक्त चारच शब्दात म्हणाला…