Khashaba Marathi Movie: आजपर्यंत क्रीडाक्षेत्रातील महान खेळाडूंच्या जीवनावर आधारित अनेक बायोपिक बनले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, कपिल देव, मेरी कोम, मोहम्मद अझरुद्दीन, मिल्खा सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. आता या यादीत आणखी एक नाव जोडले जाणार आहे. ते नाव महाराष्ट्राचेच नाही, तर अवघ्या देशाची मान अभिमानाने उंचावणारे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे आहे.
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Director Nagraj Manjule) यांनी खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक घेऊन येत आहेत. अशात त्यांनी ‘खाशाबा’ (Khashaba) नाव असलेल्या या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे.
नागराज मंजुळे यांची पोस्ट
‘सैराट’, ‘नाळ’ असे शानदार सिनेमे देणारे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक हँडलवरून खाशाबा या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची माहिती दिली. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, शूटिंगचा कॅमेरा आणि खाशाबा लिहिलेली पाटी दिसत आहे. यावरून समजते की, सिनेमाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन करून शूटिंगला सुरुवात केली आहे. हा फोटो शेअर करत नागराज मंजुळेंनी कॅप्शनमध्ये “चांगभलं,” असे लिहिले आहे.
खाशाबा जाधव यांची कामगिरी
खाशाबा जाधव यांची महानता सांगण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. 1952मध्ये हेलसिंकी येथे पार पडलेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक जिंकले होते. अशाप्रकारे खाशाबा हे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे स्वतंत्र भारताचे पहिले खेळाडू होते.
खाशाबांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिवस
साताऱ्यात 1926 मध्ये जन्मलेले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचवर्षी 29 ऑगस्ट रोजी घोषित केला होता. (Nagraj Manjule’s upcoming Marathi movie Khashaba begins shooting read here)
हेही वाचा-
‘कुणीही सांगेल, MS Dhoni सर्वोत्तम कॅप्टन, पण रोहित शर्मा…’, अश्विनच्या मुखातून निघाले मोठे विधान
ऋतुराजचा शतकी धमाका पाहून भारावला आशिष नेहरा; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहितीये…’