---Advertisement---

‘टॉप-2 मध्ये स्थान मिळवले म्हणजे लक्ष पूर्ण झाले असे नाही’, पंजाबच्या विजयानंतर शशांक सिंग नक्की काय म्हणाला?

On: मंगळवार, मे 27, 2025 8:00 PM
---Advertisement---

पंजाब किंग्सचा (punjab kings) फलंदाज शशांक सिंगने (shashank singh) म्हटले आहे की, पंजाब संघ पॉइंट्स टेबलमध्ये टॉप- 2 मध्ये पोहोचण्यात यशस्वी झाली आहे, परंतु पूर्ण काम अजून झाले नाही. त्यांचे लक्ष ट्रॉफी जिंकणे आहे. पंजाबने मुंबईला 7 विकेट्सने पराभूत करून टॉप- 2 मध्ये त्यांचे स्थान निश्चित केले. त्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. मागच्या 11 वर्षांमध्ये ही पहिली वेळ आहे, जेव्हा पंजाब किंग्सने पहिल्यांदा प्लेऑफमध्ये स्थान निर्माण केले आहे.

शशांकने सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले, हे खूपच वेगळे आहे. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, आम्ही सर्वांनी मिळून हे यश प्राप्त केले आहे. नीलामी नंतर आम्ही एक व्हाट्सअप ग्रुप बनवला होता आणि यावर्षी ट्रॉफी जिंकण्याबद्दल त्याच्यावर भाष्य केले होते. आमचे पहिले लक्ष टॉप- 2 मध्ये पोहोचण्याचे होते आणि आम्ही ते प्राप्त केले आहे.

या 33 वर्षाच्या खेळाडूने पुढे म्हटले, विश्वास आणि कष्टाने स्वप्न सत्यात उतरते. आपले म्हणणे स्पष्ट करणे वेगळी गोष्ट आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे वेगळी. आम्ही यासाठी खूप मेहनत केली आहे आणि याचे श्रेय पंजाब किंग्सशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला जातं. आयपीएल सारख्या स्पर्धेत टॉप- 2 मध्ये स्थान मिळवणे सोपी गोष्ट नाही.

पुढे शशांक म्हणाला, टॉप – 2 मध्ये स्थान मिळवले म्हणजे काम पूर्ण झाले असे नाही. आम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे. 4 जूनला बारा वाजता जेव्हा आम्ही ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये असू, तेव्हा मी म्हणू शकेल की हो आम्ही दुनियेत सगळ्यात वरचढ आहोत.

पहिल्या दिवसापासूनच रिकी सर (Riki ponting) आणि श्रेयसचं (shreyas iyer) मुख्य आदर्श वाक्य राहिलेलं आहे की, आपल्याला नव्या संस्कृतीला विकसित करायचे आहे आणि त्याला टिकवून ठेवायचे आहे. आपल्याला एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याचे परिणाम दिसतच आहेत. रिकी सर्वश्रेष्ठ कोच आहेत, त्यांनी आमच्या मानसिकतेला आणि विश्वासाला बदलले आहे. खेळाप्रती आमचा दृष्टिकोन बदलण्याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे, असं देखील शशांक म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---