इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामने येत्या १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ३ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या चिंतेत वाढ झाली होती. संघातील मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त झाला होता. परंतु, आता त्याच्या फिटनेस बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार पुनरागमन केले होते. संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली होती. मात्र आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरित हंगाम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला होता. संघातील मुख्य फलंदाज फाफ डू प्लेसिस कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत दुखापतग्रस्त झाला होता.
सध्या सर्वत्र कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेची चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत फाफ डू प्लेसिस सेंट लुसिया किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतो. परंतु, या स्पर्धेत त्याच्या कंबरेला जबरदस्त दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला दोन सामन्यात संघाबाहेर राहावे लागले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फाफ डू प्लेसिसने सीएसकेला माहिती दिली आहे की, एक आठवडा विश्रांती केल्यानंतर तो आपली फिटनेस पुन्हा मिळवू शकतो. तो लवकरात फिट होण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे.(Big update on fitness of csk star batsman faf du plessis)
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, फाफ डू प्लेसिस गुरुवारी (१६ सप्टेंबर) युएईला पोहचल्यानंतर वैद्यकीय पथक त्याची तपासणी करणार आहे.
तसेच सूत्राने म्हटले की, ‘वैद्यकीय पथक आणि फिजियो जोपर्यंत त्याची तपासणी करत नाही, तोपर्यंत त्याच्या उपलब्धतेवर भाष्य करू शकत नाही.’ डू प्लेसिससह कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळत असलेले चेन्नई सुपर किंग्स संघातील इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्रावो देखील गुरुवारी (१६ सप्टेंबर) युएईला दाखल होणार आहेत. आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिलीच लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराह किंवा शमी नव्हे, तर ‘या’ गोलंदाजांनी भारताकडून टी२० विश्वचषकात घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
‘मला नेहमीच तुला भांडण करण्यापासून आडवायला लागायचं’, गंभीरच्या ‘त्या’ पोस्टवर युवीची कमेंट
चिंटू ते बबलू, तुमच्या लाडक्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रेसिंग रुममध्ये आहेत ‘ही’ टोपण नावं