---Advertisement---

आयपीएल २०२२ साठी विदेशी खेळाडूंबाबत आली महत्त्वाची अपडेट; ‘इतके’ खेळाडू होणार रिटेन

On: गुरूवार, ऑक्टोबर 28, 2021 8:57 PM
ipl-trophy
---Advertisement---

आयपीएल २०२२ पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. यावेळी आठ जुन्या संघांना चार खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी मिळू शकते. त्यात दोन परदेशी खेळाडू असतील. त्याचवेळी, दोन नवीन संघ लिलावापूर्वी संघात तीन खेळाडू जोडू शकतात. बीसीसीआयने नुकत्याच आयोजित केलेल्या लिलावात लखनौ आणि अहमदाबादचे संघ आयपीएलमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून बोर्डाला सुमारे १२.७ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. पुढील हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरतील. एवढेच नाही तर सामन्यांची संख्या ६० वरून ७४ होणार आहे.

एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, या आठवड्यात फ्रँचायझी आणि बोर्ड यांच्यात नियमांबाबत चर्चा होणार आहे. संघांची खेळाडू खरेदी करण्याची क्षमता ८५ कोटींवरून ९० कोटींपर्यंत वाढू शकते. आठ जुने संघ चार खेळाडूंना कायम ठेवू शकतील. यामध्ये तीन भारतीय, एक परदेशी किंवा दोन भारतीय, दोन परदेशी खेळाडू असू शकतात. त्याचवेळी, दोन नवीन संघ तीन खेळाडूंना जोडू शकतील ज्यात दोन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू आहे. २०१८ प्रमाणे या वेळीही संघांना राईट टू मॅच कार्ड (आरटीएम) वापरता येणार नाही.

लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांमध्ये तीन खेळाडू सामील होण्याबाबत अद्याप नियम स्पष्ट झालेले नाहीत. लिलावापूर्वी किंवा मेगा लिलावाच्या वेळी कायम न ठेवलेल्या खेळाडूंमधून त्यांना निवडण्याची संधी मिळेल. याबाबत बीसीसीआय येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट करू शकते. पहिल्या दोनप्रसंगात वरील दोन नियम स्वीकारले जाऊ शकतात.

फ्रँचायझींना नोव्हेंबर अखेरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची माहिती देण्यास सांगितले जाईल. जर एखाद्या संघाने तीन खेळाडूंना कायम ठेवले तर पहिल्या खेळाडूचे वेतन १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूचे वेतन ११ कोटी आणि तिसऱ्या खेळाडूचे वेतन ७ कोटी मानले जाईल. फ्रँचायझीच्या एकूण रकमेमधून ही रक्कम कमी केली जाईल. दोन खेळाडूंना कायम ठेवल्यास ही रक्कम १२.५ आणि ८.५ कोटी होऊ शकते. यावेळी लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कहर! नामिबियाच्या गोलंदाजाने सामन्याच्या पहिल्याच षटकात घेतल्या ३ विकेट्स, आयसीसीकडूनही कौतुक

कमाल राहुल आणि हिटमॅन रोहितच्या खांद्यावरच न्यूझीलंडविरुद्धची जबाबदारी; वाचा ही आकडेवारी

‘तुम्ही कोणत्या देशाचे याने फरत पडत नाही’, वकार युनूसला माजी पाकिस्तानी खेळाडूचाच घरचा आहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---