एकीकडे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. अशातच दुसरीकडे भारताचा सण म्हटली जाणारी सर्वात मोठी टी20 लीग इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची तयारीही सुरू झाली आहे. आयपीएल प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यावेळी आयपीएल 2024 स्पर्धेचा लिलाव देशाबाहेर होणार आहे. चला तर, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
आघाडीची क्रिकेट वेबसाईट क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयपीएल 2024 लिलाव (IPL 2024 Auction) दुबई येथे होण्याची शक्यता आहे. तसेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या लिलावाचे आयोजन 15 ते 19 डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. तसेच, महिला प्रीमिअर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएल स्पर्धेचा लिलाव 9 डिसेंबरला होण्याची आशा आहे. मात्र, डब्ल्यूपीएल लिलावासाठीचे ठिकाण अद्याप निवडले गेले नाहीये. फ्रँचायझींना बोर्डाकडून कोणताही अधिकृत मेल पाठवला गेला नाहीये. मात्र, चर्चेला उधाण आले आहे की, आयपीएलच्या लिलावाचे आयोजन दुबईत केले जाईल.
बीसीसीआयने मागील वर्षीचा लिलाव इस्तांबुल येथे आयोजित करण्याचा विचार केला होता. मात्र, शेवटी कोची येथे करण्याचा निर्णय घेतला गेला. मागील वर्षीप्रमाणे दुबईची योजनाही अस्थायी असू शकते, पण सर्व आयपीएल फ्रँचायझींना लिलाव स्थळाच्या रूपात गल्फ शहरांचा विचार करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
Major IPL 2024 updates. [Cricbuzz]
– Dubai is likely to host the IPL auction.
– December 18 or 19 will be the auction date.
– Trade window is open. pic.twitter.com/VPhWTuErq1— Johns. (@CricCrazyJohns) October 26, 2023
ट्रेडिंग विंडो सध्या खुली झाली आहे, पण अद्याप आयपीएल फ्रँचायझींमध्ये खेळाडूंची अदलाबदल करण्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीये. असे म्हटले जात आहे की, लवकरच रिटेन आणि खेळाडूंची यादीही समोर येत आहे. अशातच बीसीसीआयने आतापर्यंत मालकांना महिला प्रीमिअर लीगच्या लिलावाच्या स्थान आणि तारखांबाबत सांगितले नाहीये. असा सल्ला दिला जात आहे की, स्पर्धा यावर्षी फेब्रुवारीत खेळवली जाऊ शकते. खरं तर, महिला संघाला जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.
संघांना याबाबत पुष्टी मिळाली नाहीये की, डब्ल्यूपीएल एकाच शहरात आयोजित केली जाईल की, आयपीएलप्रमाणे पुन्हा वेगवेगळ्या शहरात आयोजन होईल. खरं तर, मागील वर्षी संपूर्ण लीगचे आयोजन मुंबईत झाले होते. (big updates on ipl 2024 auction for players venue date and time know here all)
हेही वाचा-
‘देवा अशी बायको सर्वांना दे…’, धवनने ‘त्या’ महिलेविषयी साधला संवाद; व्हिडिओ तुफान व्हायरल
अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने जिंकला टॉस, सामन्यात एकूण 5 धुरंधरांचे पुनरागमन; पाहा Playing XI