टोकियो ऑलिंपिक २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) महिला टेनिसच्या एकेरी गटातील तिसरा राऊंडचा सामना पार पडला. हा सामना झेक रिपब्लिक आणि जपानमध्ये झाला. या सामन्यात सुवर्ण पदकाची दावेदार मानली जाणारी जपानची टेनिसपटू नाओमी ओसाकाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत ४१ व्या क्रमांकावर असणाऱ्या झेक रिपब्लिकच्या मार्केटा वोंड्रासोव्हाने नाओमीला पराभूत केले.
झेक रिपब्लिकच्या मार्केटाने चांगली कामगिरी करत नाओमीला ६-१ आणि ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत सामना आपल्या नावावर केला. मार्केटाचा हा खेळ पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमाकांवर असणारी ओसाका अशा पद्धतीने पराभूत होईल, याचा कुणी विचारही केला नव्हता. (Big Upset In Tokyo Olympics 2020 Japans Naomi Osaka Lost Wondrasova Defeated In Straight Set)
Daring to dream.
🇨🇿 Marketa Vondrousova is the first player through to the women’s singles quarterfinals, upsetting Naomi Osaka in straight sets. #Olympics • #Tennis • #Tokyo2020 pic.twitter.com/wWVyxva7Kz
— #AusOpen (@AustralianOpen) July 27, 2021
यापूर्वी रविवारी (२५ जुलै) चीनच्या झेंग सायसायविरुद्ध झालेल्या सामन्यात ओसाकाने ६-१ आणि ६-४ ने विजय मिळवला होता. त्यानंतर सोमवारी (२६ जुलै) स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिजा गुलोबिकविरुद्ध झालेल्या सामन्यात ओसाकाने ६-३ आणि ६-२ ने विजय मिळवला होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?
-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका