---Advertisement---

आधी त्याचे राहिलेले पैसे द्या, मग बोला- श्रीशांतच्या पत्नीचा या व्यक्तीवर जोरदार हल्लाबोल

On: बुधवार, नोव्हेंबर 28, 2018 3:53 PM
---Advertisement---

मुंबई । सध्या भारतीय संघाचा एकवेळचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांत चांगलाच चर्चेत आहे. याला कारण म्हणजे हा खेळाडू सध्या बीग बाॅसच्या घरात आहे.

काही दिवसांपुर्वीच ‘त्याने आपल्याला मॅच फिक्सिंग प्रकरणात कसं अडकवलं गेल आणि आपण कसे निर्दोष आहोत’ हे बीग बाॅसमध्ये सांगितल. यावेळी तो रडत होता.

राजस्थान राॅयल्स संघाचा मालक राज कुंद्राने हाच व्हिडीओ शेअर करत श्रीशांतची टर उडवली. तसेच एपिक अशी त्याला कमेंट केली.

यामुळे श्रीशांतची पत्नी भुवनेश्वरी कुमारी मात्र चिडली. तीने राज कुद्राला ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले. एका चाहत्याच्या ट्वीटला रिप्लाय करताना तिने कुंद्रावर जोरदार निशाना साधला.

वाचा-बीसीसीआय पक्षपाती असल्याचा आरोप श्रीसंतने मागे घ्यावा: कपिल देव

श्रीशांतची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तुमची नाही. तुम्ही त्याची मजाक करत आहात पण त्याचे पूर्ण मानधन अजूनही तुम्ही दिले नाही. श्रीशांतवर खोटे आरोप लावल्यामुळे त्याची भरपूर नुकसान झालं आहे. त्याचा कठीण काळ मी माझ्या डोळ्याने पाहिला आहे’. असा ट्वीट केला आहे.

वाचा- सचिन सोबतची आठवण सांगताना श्रीसंत चक्क ढसाढसा रडला

श्रीशांत राजस्थान राॅयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळला होता. त्यावेळी त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्यानंतर त्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता देखील झाली आहे. परंतु त्याला बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला अजूनही परवानगी दिली नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाने घेतला हा मोठा निर्णय

मिताली राज- हरमनप्रीत प्रकरण काही थांबेना, पुन्हा नवा खुलासा जगासमोर

ज्या विक्रमासाठी सचिनला २१ वर्ष लागली तो विराट केवळ ७ वर्षांत मोडणार

मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस

हा दिग्गज म्हणतो, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा नकोच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment