भारताकडून विंडिजविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या युवा फलंदाज पृथ्वी शॉला महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे)कडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंग यांनी केले आहेत.पण हे आरोप खोटे असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.
अखिलेश प्रसाद सिंग यांनी गुजरातमध्ये बिहारी नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याविषयी सांगताना हा आरोप केला आहे. त्यांनी हे हल्ले योग्य नसल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पृथ्वी बद्दल बोलताना सांगितले की तो बिहारमधील मानपुरचा मुळरहिवासी आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबालाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्याच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करुन मनसेचे काही नेता आणि कार्यकर्त्यांकडून धमकी दिली जात आहे. पण त्याच्या कुटुंबातील सदस्य याबद्दल काही बोलण्यास तयार नाहीत.
या आरोपाबद्दल मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी जर पृथ्वीचे कुटुंबातील सदस्य कोणताही आरोप करत नसताना बिहारचे खासदार असे आरोप कसे करु शकतात असा प्रश्न विचारताना हे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.
पृथ्वी हा लहानपणापासून मुंबईमध्ये राहत असून तो देशांतर्गत क्रिकेटही मुंबईकडून खेळतो. तो सध्या विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत असून त्याने या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात शतक केले आहे. तर दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- धोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं
- कसोटी सामना सुरु असतानाच रोहित शर्माचे नाव या संघाच्या प्लेयिंग ११ मध्ये
- दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयासह दक्षिण अफ्रिकेची मोठ्या क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी