वेस्टइंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (icc under 19 World Cup) स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील १८ व्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी करत या सामन्यात २४ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तान संघातील खेळाडूने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Bilal Sami celebration)
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेला पराभव हा अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. या स्पर्धेत पराभव होत असला, तरी देखील अफगाणिस्तान संघातील खेळाडूंचा उत्साह कमी पडत नाहीये. हे खेळाडू त्याच उत्साहाने मैदानात उतरत आहे.
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघातील गोलंदाजाने असे काही सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडीओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
तर झाले असे की, अफगाणिस्तान संघाचा १८ वर्षीय गोलंदाज बिलाल सामी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने हसीबुल्लाह खानला शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर हसीबुल्लाह खानने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो चेंडू बॅटचा कडा घेत, यष्टिरक्षकाच्या हातात गेला.
फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाज बिलाल सामीला इतका आनंद झाला की, त्याने सेलिब्रेशन करत असताना वाघासारखी डरकाळी फोडताना दिसून आला होता. त्याचे हे सेलिब्रेशन पाहून तुम्ही अंदाज घेऊ शकता की, त्याला गडी बाद करून किती आनंद झाला असेल. हा गडी नाद केल्यानंतर त्याच्या संघ सहकाऱ्यांनी देखील त्याची पाठ थोपटली.
https://www.instagram.com/reel/CY9CqHOF3wM
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला ९ गडी बाद २३९ धावा करण्यात यश आले होते. पाकिस्तान संघाकडून अब्दुल फसीहने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली होती. पाकिस्तान संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाला अवघ्या २१५ धावा करता आल्या.
महत्वाच्या बातम्या :
“स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे…” बीबीएल पदार्पणानंतर उन्मुक्त झाला भावूक
पुजारा-रहाणेचे ‘बुरे दिन’ सुरू! संघातील जागा तर जाणारच सोबत आर्थिक नुकसानही पक्के
हे नक्की पाहा: