Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे…” बीबीएल पदार्पणानंतर उन्मुक्त झाला भावूक

January 21, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
chand-bbl

Photo Courtesy: Twitter/BBL


काही महिन्यांपूर्वी भारतीय १९ वर्षाखालील संघाचा विश्वविजेता कर्णधार उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला वरिष्ठ संघात स्थान मिळत नव्हते. याच कारणास्तव त्याने देशांतर्गत क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. तो आता सध्या अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतोय. दरम्यान बिग बॅश लीग स्पर्धेत (Big bash league) पदार्पण केल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

उन्मुक्त चंदने अमेरिकेचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या तो बिग बॅश लीग स्पर्धेत मेलबर्न रेनेगड्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. मंगळवारी (१८ जानेवारी ) मेलबर्नच्या मैदानावर होबार्ट हरीकेन्स आणि मेलबर्न रेनेगड्स यांच्यात रोमांचक सामना पार पडला होता. या सामन्यात उन्मुक्त चंदला बिग बॅश लीग स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. असा कारनामा करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता.

उन्मुक्त चंदचे स्वप्नं सत्यात उतरल्यानंतर त्याने ट्विट करत आपले मत मांडले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “एमसीजीमध्ये खेळणं हे स्वप्नं सत्यात उतरण्यासारखे आहे. मैदानात प्रवेश करताच मला एका लहान मुलासारखा अनुभव आला. मला हवं होता तसा परिणाम आला नाही. परंतु हा एक सुखद अनुभव होता. यातून अनेक सकारात्मक गोष्टी मी पुढे घेऊन जाऊ शकतो. मोठ्या स्टेजवर पुनरागमन करून बरे वाटले..”

It’s been a dream come true 2 play at the @MCG. Felt a childlike energy entering the G. Not the result we wanted, nonetheless, a gud outing. Hopefully can take a lot of +ves frm this & apply on my nxt & coming adventures. Feels good 2 be back on the big stage. @BBL @RenegadesBBL pic.twitter.com/FHLEjKGXyu

— Unmukt Chand (@UnmuktChand9) January 19, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो आता जगातील इतर टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास पात्र झाला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने ६८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने २०१२ मध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

महत्वाच्या बातम्या :

तीन वर्षे आणि तब्बल २३३ चेंडूंनंतर बुमराहला मिळाली ‘ती’ विकेट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपवला दुष्काळ

चार चेंडूवर ४ बळी!! विश्वास नाही बसणार पण हे घडलंय, BBLमध्ये ऑसी गोलंदाजाचा भन्नाट कारनामा

हे नक्की पाहा:


ADVERTISEMENT
Next Post
Virat Kohli-Mohammad-Rizwan-Babar-Azam

टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार 'या' दिवशी

Virat-Kohli-Babar-Azam

मोठा बातमीः भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, याचवर्षी ‘या’ दिवशी खेळणार सामना

Photo Courtesy: Twitter/@BCCI

मोठी बातमीः 'रोहितसेने'साठी विश्वचषकाचा पहिला टप्पा आहे सोप्पा, भारताच्या ‘अ’ गटात आहेत हे संघ

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.