आजपर्यंत अनेक भारतीय खेळाेडूंवर चित्रपट बनले गेले आहेत. यामध्ये एमएस धोनी, एमसी मेरी कॉम, साइना नेहवाल अशा दिग्गजांचा समावेश आहे. आता अजून एक खेळाडूवर चित्रपट बनणार आहे. परंतु, हा खेळाडू धोनी आणि मेरीसारखा प्रसिद्ध नाही. तसेच तो आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला देखील नाही. तरीदेखील मोशन पिक्चर्स या खेळाडूच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवत आहे. या खेळाडूचे नाव प्रवीण तांबे (praveen tambe) आहे. तो यापूर्वी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आहे.
सन २०१२ मध्ये ४१ वर्षीय तांबेने मुंबई संघाकडून खेळताना त्याने विजय हजारे ट्रॉफीत पदार्पण केलेले. त्यानंतर तो आयपीएलमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळला. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade) या चित्रपटात प्रवीन तांबेची मुख्य भूमिका साकारणार आहे. यापूर्वी क्रिकेटवर आधारीत चित्रपट इकबालमध्ये श्रेयसने अप्रतिम अभियन केला होता. आता पुन्हा एकदा त्याच्याकडून त्याचप्रकारच्या कामाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आशीष विद्यार्थींसोबत श्रेयसने या चित्रपटाची शुटिंग देखील सुरू केली आहे, अशी माहिती मिळाली आहे.
अशी आहे तांबेची संपूर्ण क्रिकेट कारकीर्द
तांबेच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्यांना खूपच उशीरा यश मिळाले. खेळाडू ज्या वयात निवृत्तीचा विचार घेतात, त्या वयात तांबेंला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने ४२ व्या वर्षी रणजी ट्रॉफीतदेखील पदार्पण केले. तांबेंने २००८- २००९ मध्ये आयपीएलदरम्यात डी वाय पाटील स्टेडियममध्ये काम केले होते. राजस्थानने त्याला ट्रायल्ससाठी बोलवले आणि तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्यानंतर तो गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी देखील खेळला.
वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये देखील तांबे खेळला आहे. या लीगमध्ये खेळणारा तो पहिले भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना संघात सामील केले होते. मात्र, ते त्याचवर्षी यूएईतील टी१० लीगमध्ये सहभागी झाले असल्यामुळे, त्यांना कोलकाता संघाकडून खेळता आले नाही.
त्यानंतर तांबेंनी निवृत्ती घेतली होती. परंतु, मुंबईच्या टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी त्याने पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यावेळी तो कोलकाता संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहेत आणि टी१० लीगमध्ये खेळत आहे.
महत्वाच्या बातम्या –
संघसहकारीच म्हणतोय, ‘तुझी जीभ खूप चालतेय सूर्या’; वाचा सविस्तर
विराट, रोहित नव्हे, तर केवळ ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना मिळाले आयसीसीच्या पुरस्कारांसाठी नामांकन
Good Bye 2021 | यावर्षी ‘या’ ४ भारतीय खेळाडूंनी धमाकेदार एन्ट्री करत गाजवले पदार्पण
व्हिडिओ पाहा –