बुधवारी (८ डिसेंबर) भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासह १४ व्यक्तींचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. ही घटना कुन्नुरमध्ये घडली. या घटनेत बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी देखील होत्या. त्यांचे हेलिकॉप्टर हवेतून खाली पडले. त्यानंतर त्याला आग लागली. ज्यामध्ये बिपिन रावत यांच्यासह १४ व्यक्तींचे निधन झाले. या धक्कादायक घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. परंतु अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला बिपिन रावत यांनी लष्कराची ट्रेनिंग दिली होती.
एमएस धोनीने एका वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. परंतु, अनेकांना माहीत नसेल की, क्रिकेट कारकीर्द सुरू असताना देखील धोनी सैन्यात भरती झाला होता. धोनीला २ वर्षांपूर्वी रावत यांनी टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल बनण्यासाठी ट्रेनिंग देण्याची परवानगी दिली होती. त्यांनी २ महिने एमएस धोनीला पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण दिले होते.
एमएस धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यावरून घेतली होती माघार
त्यावेळी भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. तेव्हा एमएस धोनीने बीसीसीआयला म्हटले होते की, तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीये. कारण त्याला पुढील २ महिने लष्कराला द्यायचे होते.
तसेच एमएस धोनीबद्दल बोलताना रावत यांनी मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, “तो सैन्यात त्याची कर्तव्ये योग्यरीत्या पार पाडत आहे. तो इतर सैनिकांप्रमाणेच संरक्षकाची भूमिका बजावेल.धोनीने बेसिक ट्रेनिंग घेतली होती. आम्हाला माहीत आहे की, तो आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडू शकतो.” जेव्हा एखाद्या भारतीय नागरिकाला लष्कराचा गणवेश दिला जातो. त्यावेळी तो आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमी तयार असतो.
महत्वाच्या बातम्या :






