भारतीय संघाचा निळ्या जर्सीत दिसणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आपले स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे असते. असे काहीसे झाले होते भारतीय माजी क्रिकेटपटू अमय खुरासियाबरोबर. त्याला ३० मार्च १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.
पुण्यात झालेल्या सामन्यात त्याने ४५ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंका संघासमोर एक भले मोठे आव्हान ठेवले होते. तसेच शेवटी हा सामनादेखील जिंकला होता.
खुरासियाला (Amay Khurasiya) या खेळीचा खूप फायदा झाला. भारतीय संघाला मधल्या फळीत वेगाने धावा करण्यासाठी फलंदाजाची आवश्यकता होती. अशामध्ये त्याला १९९९च्या आयसीसी विश्वचषक संघात सामील करण्यात आले होते. या स्पर्धेच्या सुरुवातीला २ सामने पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केली.
या दरम्यान खुरासियाला चांगली कामगिरी करता आली नाही. कारण त्याला संपूर्ण विश्वचषकादरम्यान एकदाही अकरा जणांच्या संघात सामील केले नाही. राहुल द्रविड (Rahul Dravid), अजय जडेजा (Ajay Jadeja) आणि रॉबिन सिंग (Robin Singh) या खेळाडूंमुळे त्याला स्थान मिळवता आले नव्हते.
संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने केवळ १२ वनडे सामने खेळले. तसेच सततच्या खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. तरी २००७पर्यंत तो मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी सामने खेळत होता. खूप कमी लोकांना माहित आहे की, खुरासियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आयएएसची परिक्षा उत्तीर्ण झाला होता.
अशाप्रकारे त्याला भारतीय संघातील सर्वाधिक शिक्षण घेणारा (Most Educated player) क्रिकेटपटूही म्हटले जाते. यावर्षी खुरासियाने राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठीही बीसीसीआयला अर्ज केला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कर्णधार झाल्या झाल्या बाबर आझमची या खेळाडूने काढली अब्रू
-१० भारतीय क्रिकेटपटू व त्यांच्या फेमस एक्स गर्लफ्रेंड्स
-पाकिस्तानला २वेळा विकले तरीही नाही देता येणार आमिर खानची अर्धी फीदेखील