---Advertisement---

Valentines Day Special : हमारी अधुरी कहानी! १० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स

---Advertisement---

मागील अनेक दशकांपासून क्रिकेटपटूंचे नाव एखाद्या अभिनेत्रीशी किंवा कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या सेलिब्रेटी मुलीशी जोडले जाते. अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्नही केले आहे. तर अनेक क्रिकेटपटूंचे अभिनेत्रींशी प्रेमसंबंध होते. पण काही क्रिकेटपटूंचा अपवाद वगळला तर अनेकांचे प्रेमसंबंध बऱ्याच काळ टिकू शकले नाही. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने वेगळे झाले. पण तरीही त्यांच्याबद्दल मोठ्या चर्चा झाल्या होत्या. व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण अशाच काही प्रेमकहाण्यांबद्दल जाणून घेऊया.

१० भारतीय क्रिकेटपटू व त्यांच्या प्रसिद्ध एक्स गर्लफ्रेंड्स –

१०. युवराज सिंग-किम शर्मा:
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे नाव अनेक अभिनेत्रींंशी जोडले गेले आहे. पण त्यातही किम शर्मा बरोबर असलेल्या त्याच्या नात्याबद्दल अधिक चर्चा झाली. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्रही पहाण्यात आले होते. पण काही रिपोर्टनुसार त्यांच्या नात्याला युवराजच्या आईचा नकार असल्याने त्यांनी वेगळे होण्याचा मार्ग स्विकारला. पुढे जाऊन किमने अली पंजानी या व्यावसायिकाशी तर युवराजने अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले.

९. हार्दिक पंड्या-इशा गुप्ता:
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणवरुन चर्चेत राहिला आहे. त्याचे नाव एली अवराम या अभिनेत्रीबरोबरही जोडले होते. पण नंतर पुन्हा त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताशीही जोडले गेले. हे दोघे एका पार्टीत भेटले होते. त्यामुळे त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधान आले होते.

काही रिपोर्टनुसार हार्दिक आणि इशाची जवळीक वाढली असल्याने त्यांच्यात अफेअरही सुरु झाले होते. परंतू त्यांचे अफेअर बऱ्याच काळासाठी टिकले नाही. काही वर्षांपूर्वीच हार्दिकने सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकबरोबर साखरपूडा केला आहे.

८. झहिर खान आणि इशा शरवानी:
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहिर खान आणि अभिनेत्री व नृत्यांगना असलेली इशा शरवानी बरेच वर्षे एकत्र होते. ते त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल गंभीरही होते. त्यांना अनेकदा एकत्र फिरतानाही पहाण्यात आले होते. २०११ विश्वचषकादरम्यान हे दोघे लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र २०१२ ला त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताने अनेकांना आश्चर्य वाटले होते. इशाने स्वत: या बातमीची पुष्टी केली होती. यानंतर २०१७ मध्ये झहिरने मराठी अभिनेत्री सागरिका घाटगेबरोबर लग्न केले.

७. एस श्रीसंत आणि रिया सेन:
भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतचे नाव बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनबरोबर जोडले गेले होते. या दोघांना अनेकदा एकत्र वेळ घालवताना पाहण्यात आले होते. तसेच जेव्हा श्रीसंत कोची टस्कर्स केरलाकडून आयपीएलमध्ये खेळत होता, तेव्हाही रियाने काही सामन्यांना हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण या दोघांनीही ते केवळ चांगले मित्र असल्याचेच म्हटले होते. श्रीसंतने नंतर जयपूरमधील भूवनेश्वरी कुमारीबरोबर लग्न केले. त्यांना २ आपत्यही आहेत.

६. रवी शास्त्री-अमृता सिंग: 
भारताचे सध्याचे प्रशिक्षक आणि माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचे त्यांच्या तारुण्यात अभिनेत्री अमृता सिंगबरोबर अफेअर असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. अमृता शारजा स्टेडियमवर शास्त्रींना प्रोत्साहन देतानाही दिसली होती. पण त्यांच्यातील संबंध पुढे टिकले नाहीत. पुढे जाऊन शास्त्रींनी रितू सिंगबरोबरच तर अमृताने सैफ अली खानबरोबर लग्न केले.

५. सुरेश रैना-श्रृती हसन: 
२०१४ मध्ये भारताचा फलंदाज सुरेश रैना आणि कमल हसनची मुलगी श्रृती हसनमध्ये अफेअर असल्याचे वृत्त होते. काही रिपोर्टनुसार त्या दोघांच्या एका जवळच्या मित्राने त्यांची भेट घडवली होती. श्रृती चेन्नई सुपर किंग्सचे काही सामनेही पहायला आली होती. तसेच रैना तिला लकीही मानत होता. पण काही कारणास्तव त्या दोघेही वेगळे झाले. रैनाने नंतर साॅफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या प्रियांका चौधरीशी लग्न केले. त्यांना आत्ता एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

४. सौरव गांगुली-नगमा:
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि अभिनेत्री नगमा यांच्यात अफेअर असल्याच्याही चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या. ते दोघे २००१ च्या दरम्यान मंदिरात पूजा करतानाही दिसले होते. पण त्यावेळी गांगुलीने आधीच त्याची बालमैत्रीण डोनाबरोबर लग्न केलेले होते. त्यामुळे जेव्हा नगमा आणि गांगुलीच्या नात्याबद्दल चर्चा होत होत्या तेव्हा डोनाने मुलाखत देत या चर्चांसाठी मीडियाला जबाबदार धरले होते.

गांगुलीने मात्र याबद्दल कधीच कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. पण काही वर्षांपूर्वी नगमाने गांगुलीच्या पुढील कारकिर्दीवर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्यापासून वेगळे झाल्याचे म्हटले होते.

३. एमएस धोनी-दिपिका पदुकोण:
भारताचा यशस्वी कर्णधार एमएस धोनी आणि बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण यांच्यातील अफेअरच्याही चर्चा काही वर्षांपूर्वी रंगल्या होत्या. दिपिका भारताच्या अनेक सामन्यांसाठीही उपस्थित राहिली होती. पण या चर्चा खूप काळ चालल्या नाही. कारण नंतर धोनीने साक्षी सिंग रावतशी जूलै २०१० ला लग्न केले. तर २०१८ ला दिपिकाने अभिनेता रणवीर सिंगशी लग्न केले.

२. रोहित शर्मा-सोफिया हयात: 
भारताला सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचे सोफीया हयात बरोबर प्रेमसंबंध असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी झाली होती. त्यांना अनेकदा पार्ट्यांमध्येही एकत्र पहाण्यात आले होते. पण रोहितने मीडियासमोर ती केवळ त्याची फॅन असल्याचे म्हटले होते. पण सोफीयाने ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे मान्य केले होते. तसेच २०१२ ला त्यांच्यात ब्रेकअप झाल्याचाही ट्विट तिने केला होता. तसेच नंतर तिने त्याला ट्विटरवर ब्लॉक केले असल्याचेही सांगितले.

रोहितने नंतर २०१५ ला त्याची स्पोर्ट्स मॅनेजर रितिका सजदेहबरोबर लग्न केले. त्यांना सध्या समायरा नावाची मुलगी देखील आहे.

१. विराट कोहली-इजाबेल लिटे:
भारताचा कर्णधार विराट कोहली जून २०१२ मध्ये एका ब्राझीलच्या अभिनेत्री इजाबेल लिटेला डेट करत असल्याची बातमी आली होती. विराट सिंगापूरमध्ये इजाबेल सोबत खरेदी करतानाही दिसला होता. तेव्हा इजाबेलला कोणी ओळखत नव्हते. त्यानंतर तिचा पहला सिनेमा प्रदर्शित झाला होता.

२०१४ मध्ये एका मुलाखतीत इजाबेलने कबूल केले होते की ती आणि विराट कोहली २ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांच्यातील संबध परस्पर संमतीने संपले. त्यानंतर ते चांगले मित्र झाले. इजाबेलच्या मित्रांच्यानुसार ते दोघे एका जाहिरातीच्या शूटींग दरम्यान सिंगापुरमध्ये भेटले होते. तसेच इजाबेल विराटच्या प्रेमात होती. ती विराटला भेटायला दिल्लीलाही जात होती. पण ते दोघे फारसे सार्वजनिक ठिकाणी जात नसत. नंतर विराटने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर लग्न केले.

महत्वाच्या बातम्या:

Valentines Day Special : जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या केन विल्यमसनची नर्सला पाहून पडली विकेट!

एकूण खेळाडू २०४ आणि करोडोंची खैरात! असा राहिला आयपीएलचा मेगा ऑक्शन

यंदाचा महागडा खेळाडू ठरताच ‘इशान किशन’ लागला नाचू, ‘झिंगाट’वर केला भन्नाट डान्स

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---