---Advertisement---

वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अँडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

On: गुरूवार, जुलै 30, 2020 7:53 PM
---Advertisement---

आज(३० जूलै) इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनचा ३८ वा वाढदिवस. कसोटी क्रिकेटमध्ये १५३ सामन्यात ५८९ विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज समजले जाते.

अशा या महान गोलंदाजाबद्दल काही खास गोष्टी-

-जेम्स अँडरसनचा जन्म ३० जूलै १९८२ रोजी बर्नली, लँकेशायर येथे झाला. त्याचे पुर्ण नाव जेम्स मायकेल अँडरसन.

-त्याने क्रिकेट खेळायला खूपच लवकर सुरुवात केली आणि वयाच्या १७व्या वर्षीच तो लँकेशायरमधील एक वेगवान गोलंदाज म्हणुन ओळखला जात होता.

-वयाच्या २०व्या वर्षीच त्याने वनडे कारकिर्दीला सुरुवात केली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर त्याने पारंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला. यात त्याने ऍडम गिलख्रिस्टला त्रिफळाचीत केले होते.

-ऍटिट्युड या मासिकासाठी न्युड फोटोशेसन करणारा तो जगातील पहिला क्रिकेटर ठरला होता.

-त्याचा क्रिकेटर मित्र ग्रॅमी स्वाॅनबरोबर त्याने रेडियोवर एका कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते. क्रिकेट या विषयावर असलेल्या या कार्यक्रमाचे नाव Not Just Cricket असे होते.

-मे २००३ ला लॉर्ड्स मैदानावर कसोटी पदार्पण करण्यापुर्वी एक आठवडा आधी त्याने लँकेशायरकडून हॅट्रिक घेणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा मान मिळवला होता.

-पदार्पणाच्या कसोटीत त्याने पहिल्याच डावात झिंबाब्वेविरुद्ध १६ षटाकांत ७३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

– अँडरसन हा लॉर्ड्स मैदानावर १०० पेक्षा अधिक कसोटी विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याने या मैदानावर १०३ विकेट्स घेतल्या आहेत.

-त्याची एकवेळी डेविड बेकहमशी लूक्स आणि स्टाईलबद्दल तुलना केली जात असे.

-जेम्स अँडरसन हे नाव अनेक खेळात महान झालेल्या खेळाडूंचेही आहे. एवढेच नाही तर याच नावाचा एक खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळला आहे.

-अँडरसन मायकेल वाॅनच्या नेतृत्वाखाली २१ कसोटी सामने खेळला. त्यात त्याने ३४.४६च्या सरासरीने ७६ विकेट्स घेतल्या. त्याला मायकेल वाॅन हा कर्णाधार म्हणुन कधीच आवडला नाही. “एका चांगल्या कर्णधाराला माहीत असते की आपल्या टीमशी कसा संवाद साधला पाहिजे. मला वाटते मायकेल वाॅनला ते कधी जमलेच नाही. ” असे तो एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

-जेम्स अँडरसनच्या दाढीचेही ट्विटर अकाऊंट आहे.

-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला अँडरसनने १४ कसोटीत तब्बल ९वेळा बाद केले आहे. या प्रकारात सचिनला कुणीही एवढ्या वेळा बाद केलेले नाही.

-इंग्लंडकडून वनडेत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज होण्याचा मान अँडरसनच्या नावावर आहे. त्याने २००३ला पाकिस्तानविरुद्ध अब्दुल रझ्झाक, शोएब अख्तर आणि मोहम्मद सामीला बाद केले होते.

-कसोटीप्रमाणेच इंग्लंडकडून सर्वाधिक वनडे विकेट्स घेण्याचा विक्रमही अँडरसनच्या नावावर आहे. त्याने १९४ वनडेत २६९ विकेट्स घेतल्या आहेत.

-इंग्लंडकडून केवळ तीन खेळाडूंनी आजपर्यंत १९०पेक्षा जास्त वनडे सामने खेळले आहेत. त्यात ओएन मॉर्गनने २१४, पाॅल काॅलिंगवुडने १९७ तर जेम्स अँडरसनने १९४ सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे या १९४ सामन्यात ७९ डावात फलंदाजी करताना त्याने जेमतेम २७३ धावा केल्या आहेत.

– अँडरसन हा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. त्याने १५३ कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या पुढे फक्त ऍलिस्टर कूक असून त्याने १६१ कसोटी सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-…आणि इथेच वेस्ट इंडिजची टीम चूकली, या दिग्गजाने सांगितले वेस्ट इंडिजच्या पराभवाचे कारण

-भारताचा हा ‘दिग्गज’ म्हणतो, स्टुअर्ट ब्रॉडच्या पायांमध्ये आहे स्प्रिंग

-हार्दिक पंड्या झाला बाबा; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली गुडन्यूज

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलच्या सर्व संघातील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, जे १३व्या हंगामात करु शकतात कमाल

-एका हाताला दोन बोटे नसतानाही क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी छाप टाकणारा गोलंदाज

-एमएस धोनीच्या सीएसके संघातील ३ फ्लॉप खेळाडू, ज्यांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतं मोठ नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment