---Advertisement---

भारताचा हा ‘दिग्गज’ म्हणतो, स्टुअर्ट ब्रॉडच्या पायांमध्ये आहे स्प्रिंग

On: गुरूवार, जुलै 30, 2020 4:57 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान स्टुअर्ट ब्रॉडला पहिल्या सामन्यात अंतिम ११ जणांमध्ये सामील केले नव्हते. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली आणि त्याने दमदार पुनरागमन केले. ब्रॉडने मॅनचेस्टर येथील तिसऱ्या कसोटीत ५०० विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रमही केला आहे. त्याची ही कामगिरी पाहून भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याची प्रशंसा केली आहे.

सचिनने ट्वीट करत लिहिले, “मालिका जिंकल्याबद्दल इंग्लंड संघाचे अभिनंदन. यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्या पायांमध्ये स्प्रिंग आहे आणि तो एका मिशनवर आहे. त्याने ५०० कसोटी विकेट्स घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन. चांगले यश मिळविले.”

ब्रॉडने मॅनचेस्टर येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी ब्रेथवेटला बाद करत त्याने आपल्या ५०० विकेट्स पूर्ण केल्या. ब्रॉड कसोटीत ५०० विकेट्स घेणारा जगातील सातवा आणि इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना २६९ धावांनी जिंकत मालिका २-१ने जिंकली.

मालिकेच्या पहिल्या सामान्यादरम्यान प्रभारी कर्णधार बेन स्टोक्सने ब्रॉडच्या जागी जोफ्रा आर्चरला सामील केले होते. त्याबद्दल ब्रॉडने नाराजी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

-स्टुअर्ट ब्रॉडमुळे जसप्रीत बुमराहचे झाले नुकसान; आयसीसी क्रमवारीत बसला झटका

-इंग्लंडने वेस्ट इंडीजचा पराभव केल्यानंतर जेसन होल्डरने यासाठी भारताकडे मागितली मदत

-झाडावर बसून ‘चिल’ करणारा विराट पाहिलाय का? पाहून व्हाल चकित…

ट्रेंडिंग लेख –

-या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…

-आयपीएल २०२० मध्ये हे ५ मोठे विक्रम मोडण्याची शक्यता…

-क्रिकेटमधील ३ अशा घटना, जेव्हा सौरव गांगुलीने केली ‘दादागिरी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---