शनिवारी (दि. 2 सप्टेंबर) भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा 35 वा वाढदिवस. इशांत हा सध्याच्या भारतीय कसोटी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने भारताकडून आत्तापर्यंत 105 कसोटी सामन्यात 311 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 80 वनडे सामन्यात 115 विकेट्स घेतल्या आहेत.
अशा या भारताच्या वेगवान गोलंदाजाविषयीच्या काही खास गोष्टी-
-इशांत शर्माचा जन्म 2 सप्टेंबर 1988 मध्ये दिल्ली येथे झाला.
-त्याने वयाच्या 14 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि 18 व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले.
-इशांतचा 2006 ला 19 वर्षांखालील भारतीय संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने 19 वर्षांखालील वनडे आणि कसोटी पदार्पण विराट कोहलीबरोबर केले आहे.
-तसेच या दोघांनी प्रथम श्रेणी आणि रणजी ट्रॉफी पदार्पणही 2006-07 च्या मोसमात दिल्लीकडून एकाच सामन्यातून केले आहे. त्यांनी पहिला सामना तमिळनाडू विरुद्ध खेळला. याच सामन्यात तमिळनाडूकडून मुरली विजयनेही पदार्पण केले होते.
-इशांतची उंची 6 फूट 4 इंच आहे. त्याच्या या उंचीमुळे त्याचे लंबू हे टोपननाव पडले.
.@ImIshant! पेड़ से नारियल निकालते निकालते, लंबू बन गया! Only fitting that your birthday is celebrated on #WorldCoconutDay.🌴 😜 Have a great one. pic.twitter.com/5Ig6bHsC5h
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 2, 2018
– 2010-11 ला झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने 9 व्या विकेट्ससाठी व्हिव्हिएस लक्ष्मणबरोबर 81 धावांची भागिदारी केली होती. ही भागिदारी भारत 216 धावांचा पाठलाग करताना केली होती.
त्यावेळी भारताची अवस्था 8 बाद 124 धावा अशी झाली असताना इशांतने लक्ष्मणची चांगली साथ देत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होतो. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात यशस्वी धावांचा पाठलाग करताना 9 व्या विकेटसाठी केलेली ही सर्वाधिक धावांची भागिदारी आहे.
-इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक हा इशांतचा ’बनी’ ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत कसोटीत कूकला 11 वेळा बाद केले आहे. कूकला सर्वाधिक वेळा बाद करण्यामध्ये इशांत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात अव्वल क्रमांकावर मॉर्ने मॉर्केल आहे. विशेष म्हणजे ऍलिस्टर कूकने 161 कसोटी सामन्यात केवळ 1 विकेट घेतली असून त्यात त्याने इशांतलाच बाद केले आहे.
Alastair Cook to Ishant Sharma, 50mph (est)
via @Peter_Davidson1
— Cricket’s great moments (@PitchedInLine) August 16, 2019
-ऑस्ट्रेलियाचे दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हे इशांत शर्माचे आदर्श आहेत.
-मे 2007 मध्ये भारताच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान भारतीय गोलंदाज मुनाफ पटेलला दुखापत झाल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून इशांत शर्माची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यातील कसोटी मालिकेतून इशांतने भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
-इशांतने वनडे पदार्पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 29 जून 2007 ला केले होते. तर टी20मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 फेब्रुवारी 2008 ला पदार्पण केले होते.
-2011-12 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इशांतने 152.2 च्या गतीने चेंडू टाकला होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय करकिर्दीतील हा सर्वाधिक गतीने टाकलेला चेंडू आहे.
-2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावेळी तो कपिल देव नंतरचा मालिकावीर होणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज होता. कपिल देव यांना 1883 मध्ये मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता.
Happy birthday @imIshant!
To celebrate, revisit his Player of the Match performance in India's #CT13 semi-final, where he took 3/33 against Sri Lanka! 🎂 pic.twitter.com/CegrB9Clbp
— ICC (@ICC) September 2, 2018
-2013 ला भारताने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदामध्ये इशांतचा मोठा वाटा होता. त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रवी बोपाराला आणि इयान मॉर्गनला 18 व्या षटकात बाद केले होते. तसेच उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या.
-कसोटीत 250 विकेट्सचा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ तिसरा वेगवान गोलंदाज आहे.
हेही वाचा-
मराठीत माहिती- क्रिकेटर इशांत शर्मा
Asia Cup 2023: कुठे आणि कसा पाहायचा भारत-पाकिस्तान सामना, लगेच जाणून घ्या