---Advertisement---

‘सोनू’चा बड्डे: टी20 स्टार Suresh Rainaबद्दल ‘या’ खास 10 गोष्टी माहिती आहेत का?

Suresh-Raina
---Advertisement---

भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सुरेश रैना आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताचा टी20 स्टार असणाऱ्या रैनाने आत्तापर्यंत 226 वनडे, 78 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 18 कसोटी सामने खेळले आहेत.

त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या या खास गोष्टी:

– 27 नोव्हेंबर 1986 मध्ये सुरेश रैनाचा उत्तर प्रदेशमध्ये जन्म झाला आहे. त्याचे वडील  त्रिलोक चंद जम्मू-काश्मिरमधील रैनावारी येथील मुळरहिवासी असून आई धरमशाला, हिमाचल प्रदेशची मुळरहिवासी आहे. पण रैना कुटुंब उत्तर प्रदेशमधील गझीयाबाद येथे स्थायिक आहे. रैनाचे वडील निवृत्त मिलिटरी ऑफिसर आहेत.

– सुरेश रैनाला तीन मोठे भाऊ आणि एक बहिण असून तो या भावडांमध्ये सर्वात लहान आहे.

– सोनू हे सुरेश रैनाचे टोपन नाव आहे.

https://twitter.com/ICC/status/1067372466023075841

-रैना क्रिकेटसाठी 1999 मध्ये गाझियाबादवरुन लखनऊमध्ये आला. तिथे स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये राहत होता. हे हॉस्टेल त्याने 2006 मध्ये सोडले. त्यावेळी त्याचे भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

– वयाच्या 16 व्या वर्षीच रैनाने 19 वर्षांखालील भारतीय संघात इंग्लंड दौऱ्यासाठी स्थान मिळवले. त्यावेळी त्याच्या बरोबर त्या भारतीय संघात अंबाती रायडू, इरफान पठाण हे भारतीय खेळाडू देखील होते.

– वयाच्या 18 व्या वर्षी 30 जूलै 2005 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मात्र या सामन्यात त्याला मुथय्या मुरलीधरन या दिग्गज गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवर बाद केले.

https://twitter.com/BCCI/status/1067284265254014976

-रैनाला विविध पदार्थ करण्याचीही आवड असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच जेव्हा त्याचा पहिल्यांदा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून दौरा होता तेव्हा त्याने अशोक डिंडासह संपूर्ण संघासाठी स्वयंपाक केला होता.

– रैना हा भारतीय संघाचे टी20 मध्ये नेतृत्व करणारा सर्वात तरुण कर्णधार आहे. त्याने 23 व्या वर्षी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

– रैना हा आयपीएल स्टारही असून त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू असून त्याच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधिक धावाही आहेत. त्याने 205 सामन्यात 32.52 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1067377273123172352

– त्याचबरोबर रैनाला गाण्याचीही आवड आहे. त्याने 2015 मध्ये मिरुठीया गँगस्टर या बॉलिवूड चित्रपटात तू मिली सब मिला हे गाणे गायले आहे. त्याचबरोबर त्याला सॅक्सोफोन हे वाद्य वाजवताही येते.

https://twitter.com/BCCI/status/972794552841994241

हेही वाचा-
क्रिकेटमध्ये 9 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत
रिंकूची विस्फोटक फलंदाजी पाहून कॅप्टन सूर्याला आली ‘या’ दिग्गजाची आठवण; म्हणाला, ‘सर्वांना माहितीये…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment