भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सुरेश रैना आज (27 नोव्हेंबर) 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज आणि एक शानदार क्षेत्ररक्षक अशी ओळख रैनाने त्याच्या कारकिर्दीत मिळवली. रैनाने 15 ऑगस्ट, 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
भारताचा टी20 स्टार असणाऱ्या रैनाने आत्तापर्यंत 226 वनडे, 78 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 18 कसोटी सामने खेळले आहेत.
सुरेश रैनाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या या खास गोष्टी:
– 27 नोव्हेंबर 1986ला सुरेश रैनाचा उत्तर प्रदेशमध्ये जन्म झाला आहे. त्याचे वडील त्रिलोक चंद जम्मू-काश्मीरमधील रैनावारी येथील मुळ रहिवासी असून आई धरमशाला, हिमाचल प्रदेशची मुळ रहिवासी आहे. पण रैना कुटुंब उत्तर प्रदेशमधील गाझीयाबाद येथे स्थायिक आहे. रैनाचे वडील निवृत्त मिलिटरी ऑफिसर आहेत.
– सुरेश रैनाला तीन मोठे भाऊ आणि एक बहिण असून तो या भावडांमध्ये सर्वात लहान आहे.
– सोनू हे रैनाचे टोपन नाव आहे.
-रैना क्रिकेटसाठी 1999 मध्ये गाझीयाबादवरुन लखनऊमध्ये आला. तिथे स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये राहत होता. हे हॉस्टेल त्याने 2006 मध्ये सोडले. त्यावेळी तो भारतीय संघाकडून खेळत होता.
#ChinnaThala and super staggering stats, always a #yellove story! #HappyBirthdayRaina 🦁💛 pic.twitter.com/LfWLHPRbwG
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 27, 2019
– वयाच्या 16 व्या वर्षीच रैनाने 19 वर्षांखालील भारतीय संघात इंग्लंड दौऱ्यासाठी स्थान मिळवले. त्यावेळी त्याच्या बरोबर त्या भारतीय संघात अंबाती रायडू, इरफान पठाण हे खेळाडू देखील होते.
– वयाच्या 18 व्या वर्षी 30 जूलै 2005 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मात्र या सामन्यात त्याला मुथय्या मुरलीधरन या दिग्गज गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवर बाद केले.
-रैनाने 1 डिसेंबर 2006 ला भारताच्या पहिल्या टी20 सामन्यातून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच जूलै 2010मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटीमध्येही पदार्पण केले.
– रैनाने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात शतक केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. त्याने वनडेमधील पहिले शतक आशिया चषकात हाँगकाँग विरुद्ध 2008 मध्ये केले होते. तर टी20मध्ये त्याने मे 2010मध्ये टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केले होते.
Happy birthday Suresh Raina!
Did you know he was the first Indian player to score a century for his country in Test, ODI and T20I cricket 🙌 pic.twitter.com/GKY92hBUEn
— ICC (@ICC) November 27, 2019
-रैनाला विविध पदार्थ करण्याचीही आवड असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच जेव्हा त्याचा पहिल्यांदा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून दौरा होता तेव्हा त्याने अशोक डिंडासह संपूर्ण संघासाठी स्वयंपाक केला होता.
– रैना हा भारतीय संघाचे टी20 मध्ये नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार आहे. त्याने 23 वर्षे 197 दिवस एवढे वय असताना भारताने झिम्बाब्वे विरुद्ध टी20मध्ये पहिल्यांदा नेतृत्व केले होते.
– रैना हा मिस्टर आयपीएल अशा टोपन नावानेही ओळखले जाते. तो आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 205 सामने खेळले आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
त्याने आयपीएलमध्ये 205 सामन्यात 32.52 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 1 शतकाचा आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.
– त्याचबरोबर रैनाला गाण्याचीही आवड आहे. त्याने 2015 मध्ये मिरुठीया गँगस्टर या बॉलिवूड चित्रपटात ‘तू मिली सब मिला हे’ गाणे गायले आहे. त्याचबरोबर त्याला सॅक्सोफोन हे वाद्य वाजवताही येते.
Here's wishing @ImRaina a very happy birthday. May your birthday be as joyous as this joyful song 🎂🎂#HappyBirthdayRaina pic.twitter.com/cpvVTJKZYK
— BCCI (@BCCI) November 27, 2019
-रैनाने 3 एप्रिल 2015 ला बालमैत्रीण प्रियांका चौधरीबरोबर विवाह केला होता. त्यानंतर त्यांना 14 मे 2016 ला कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव त्यांनी ग्रेसिया ठेवले. तसेच त्यांना एक मुलगाही असून त्याचे नाव रिओ असे ठेवले आहे.
-सुरेश रैना सध्या अबु धाबी टी10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WORLD CUP: गतविजेत्या फ्रान्सचा धडाका कायम! डेन्मार्कला धूळ चारत गाठली पुढची फेरी
उमरानने पहिली विकेट घेताच कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण, व्हिडिओ जिंकेल तुमचेही मन