दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स याने (AB de Villiers) 19 नोव्हेंबर, 2021 सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. डिविलियर्सने त्याच्या कारकीर्दीत अनेक मोठ-मोठे विक्रम केले आहेत. यामध्ये त्याचा असा एक विश्वविक्रम आहे, जो आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही, तो म्हणजे वनडेत सर्वात जलद अर्धशतक आणि शतक करण्याचा विश्वविक्रम. हे दोन्ही विक्रम डिविलियर्सच्या नावावर आहे. डिविलियर्स शुक्रवारी (दि. 17 फेब्रुवारी) 40व्या वयात पदार्पण करत आहे. चला तर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या अबाधित विक्रमांबद्दल जाणून घेऊया…
सन 2015मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज संघात 5 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 2 विकेट 439 धावा केल्या होत्या. यावेळी फलंदाजी करताना डिविलियर्सने हे विक्रम केले.
या सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करताना हाशिम अमला (Hashim Amla) आणि रायली रुसोने (Rilee Rossow) 247 धावांची सलामीची भागीदारी केली. पुढे 39व्या षटकात रुसो झेलबाद झाल्याने एबी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला. यावेळी एबीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्याने केवळ 19 मिनिटात 16 चेंडूत हा विक्रम केला. यामध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
Fastest ODI 💯
Fastest ODI fifty ✅
Insane innings 🤯#OnThisDay in 2015, AB de Villiers scored the fastest ODI hundred off 31 balls. He also claimed the record for the fastest fifty in 16 balls.Both records still stand 👏 pic.twitter.com/WvQ1O3F2Gy
— ICC (@ICC) January 18, 2021
यानंतर पुढे फलंदाजी करत एबीने अवघ्या 40 मिनिटांत जगातील सर्वात वेगवान शतक ठोकले. हे त्याने 8 चौकार आणि 10 षटकारांच्या सहाय्याने केवळ 31 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याचा हा विक्रमदेखील आजतागायत कायम आहे. त्याने या सामन्यात केवळ 44 चेंडूत एकूण 9 चौकार आणि 16 षटकारांसह 149 धावा केल्या होत्या.
वनडेत सर्वात जलद शतक करण्याच्या यादीत एबीच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कोरी अँडरसनचे (Corey Anderson) नाव येते. त्याने 2014मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 36 चेंडूत शतक केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केवळ ४० मिनिटांत झाले होते एबी डिविलियर्सचे वनडेमधील शतक; मोडले होते ‘हे’ विश्वविक्रम
…आणि एबी डिविलियर्सचे ते स्वप्न अखेर अपूर्णच राहिलं!