आज (6 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज दिलीप बलवंत वेंगसरकर यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. या महान खेळाडूचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी महाराष्ट्रातील राजापूर येथे झाला होता. 70 च्या दशकाच्या शेवटी आणि 80 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात ते भारतीय संघाचे अनुभवी फलंदाज होते.
साल 1983 ते 1987 या काळात त्यांनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला होता. क्रिकेटच्या लॉर्ड्स येथील मैदानावर त्यांनी सलग तीन शतके झळकावली होती. या मैदानावर सलग तीन शतके ठोकणारे वेंगसकर पहिले भारतीय होते. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या महान फलंदाजांनाही अशी कामगिरी करता आली नाही.
त्यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर 1979 मध्ये 0 आणि 103, तसेच 1982 मध्ये 2 आणि 157 व 1986 मध्ये नाबाद 126 आणि 33 धावांची खेळी केली होती. लॉर्ड्सच्या मैदानावर चार कसोटी सामने खेळताना त्यांनी 72.57 च्या सरासरीने 808 धावा केल्या होत्या. शेवटी 1990 मध्येही ते लॉर्ड्सच्या मैदानावर खेळले होते. परंतु त्यांना शतक करता आले नव्हते. यावेळी त्यांनी पहिल्या डावात 52 आणि दुसऱ्या डावात 35 धावा केल्या होत्या. त्यांनी 1975-76 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच ते 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्यही होते.
सन 1985 ते 1987 या काळात त्यांनी भारतीय संघासाठी खूप चांगली खेळी केली. या काळात त्यांनी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या देशांच्या संघाविरूद्ध विरुद्ध शतके ठोकली. 1987 च्या विश्वचषकानंतर कपिल देव यांच्याकडे असणारे कर्णधारपद दिलीप वेंगसरकरांना देण्यात आले होते.
त्यांनी कर्णाधाराची जबाबदारी मिळाल्यानंतर सुरूवातीलाच दोन शतके झळकावली होती. परंतु, त्यांचे कर्णधारपद कायम अडचणीत सापडत राहिले. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या 1987 च्या दौऱ्यानंतर त्यांनी आपले कर्णधारपद गमावले. त्यांनी 10 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. 1992 मधील पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ते आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांना दोन्ही डावांमध्ये दहासुद्धा धावा करता आल्या नाहीत.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 116 कसोटी आणि 129 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 116 कसोटी सामन्यांमध्ये 42.13 च्या सरासरीने 6868 धावा केल्या ज्यामध्ये 17 शतके आणि 35 अर्धशतके ठोकली. तर 129 एकदिवसीय सामन्यात 34.73 च्या सरासरीने 3508 धावा केल्या आणि त्यामध्ये फक्त शतकाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्वस्तात आऊट झाल्यावर तंबूत मॅक्सवेलची मालीश करताना दिसला विराट कोहली, Video तुफान Viral
RR vs RCB | बेंगलोरचा विजयरथ सुसाट, राजस्थानला ४ विकेट्सने हरवत नोंदवला सलग दुसरा विजय
विराटने घेतला पडीक्कलचा सुपर कॅच, पण नंतर मैदानावर जे झालं ते सिनेमापेक्षा कमी नव्हतं