---Advertisement---

मुंबईकरचा चेन्नईकर बनलेला जेसन बेहरनडॉर्फ, वाचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील रोमांचक गोष्टी

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील एकूण १२ सामने पार पडले आहेत. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या ३ सामन्यांचा यात समावेश आहे. हंगामातील पहिल्याच सामन्यात लिजारवाण्या पराभवाला सामोरे जाणाऱ्या चेन्नई संघाने पुढील सलग २ सामने जिंकत जोरदार पुनरागमन केले.

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच या संघाला मोठा धक्का बसला होता. त्यांचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक पाहता आयपीएल २०२१ चा हंगाम खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर चेन्नईने त्याची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजाची शोधशाध करायला सुरुवात केली होती. अखेर तो शोध पूर्ण झाला असून त्यांनी हेजलवूडच्या जागेवर ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ याला संधी दिली आहे.

अद्याप हा परदेशी धुरंधर चेन्नईकडून पदार्पण करू शकला नाही. परंतु आगामी सामन्यात लवकरच तो आपल्या गोलंदाजीची जादू दाखवताना दाखवताना दिसेल. महत्वाचे म्हणजे, याच डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा आज ३१ वा वाढदिवस आहे. २० एप्रिल १९९० रोजी न्यू साउथ वेल्स येथील कॅम्बडन शहरातला त्याचा जन्म.

मुंबई इंडियन्सचा राहिलाय माजी शिलेदार
जेसन बेहरनडॉर्फने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ सामने खेळले आहेत. यात त्याला ५ गडी बाद करण्यात यश आले आहे. आयपीएल २०१९ मध्ये झालेल्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्स संघाने १ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. बेहरनडॉर्फनेची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय नसली तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे.

Photo Courtesy: Twitter/IPL

जेसन बेहरनडॉर्फच्या तोंडून मराठी ऐकून रोहित झालता दंग
विशेष बाब अशी की, बेहरनडॉर्फला मराठी भाषा बोलू शकतो. युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२० हंगामात त्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता. महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे २०२० रोजी मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत सुर्यकुमार यादव बेहरनडॉर्फला काही मराठी वाक्य शिकवतो. बेहरनडॉर्फही दुसऱ्याच प्रयत्नात ती वाक्य मराठीत बोलतो. त्यानंतर तो मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासोबत जाऊन मराठीत संवाद साधतो. त्याला मराठी भाषा येत असल्याचे पाहून मुंबईकर रोहित अवाक् होतो.

जेसन बेहरनडॉर्फनेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
ऑस्ट्रेलियन संघासाठी खेळताना बेहरनडॉर्फने ११ वनडे सामन्यात १६ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने ७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत; यात त्याला ७ गडी बाद करण्यात यश आले आहे.

यासोबतच ५ आयपीएल सामन्यात त्याला ५ गडी बाद करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे बेहरनडॉर्फने त्याचे आयपीएल पदार्पण चेन्नईविरुद्धच केले होते आणि आता तो चेन्नईकडून आयपीएल खेळण्यास सज्ज झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रविंद्र जडेजाने ४ झेल घेताच एमएस धोनीचे ‘ते’ ८ वर्षांपूर्वीचे ट्विट झाले व्हायरल, पाहा असं काय लिहिलं होतं

कॅचमास्टर! केवळ जडेजाच नाही तर ‘या’ ६ क्रिकेटपटूंनीही आयपीएलमध्ये एका सामन्यात घेतलेत ४ झेल

पुन्हा एकदा स्टंप्समागून धोनीची कॉमेंट्री, पाहा गमतीदार व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---