भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनी आज आपला ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. या खेळाडूने भारताकडून सर्वाधिक सामन्यात नेतृत्व केले. तसेच सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाला सर्वाधिक सामने जिंकूनही दिले आहेत.
तरीही या माजी कर्णधाराचा असा एक विक्रम आहे जो अगदी एका सामन्याने हुकला होता. पण मागीलवर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडलेल्या आशिया चषकात पूर्ण झाला. तो विक्रम म्हणजे 200 वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याचा.
निमित्त होते ते या आशिया चषकात भारताचा नियमित कर्णधार विराटला विश्रांती दिली होती. त्यामुळे या स्पर्धेसाठी रोहित शर्मा कर्णधार आणि शिखर धवन उपकर्णधार होता. पण 25 सप्टेंबर 2018 ला अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी या दोघांनीही विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे जानेवारी 2017 ला भारतीय संघाचे सर्व प्रकारच्या क्रिकटचे कर्णधारपद सोडलेल्या धोनीने जवळजवळ दिडवर्षांनी पुन्हा भारतीय संघाची धूरा सांभाळली. हा सामना धोनीचा कर्णधार म्हणून 200 वा वनडे सामना ठरला. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीला मात्र या सामन्यात यश मिळाले नाही. हा सामना बरोबरीत सुटला.
धोनीने भारतीय संघाला कर्णधार या नात्याने 110 वनडे सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. वनडे सामन्यांत भारतीय संघाला 100 पेक्षा जास्त मिळवून देणारा तो एकमेव कर्णधार आहे.
धोनीने जानेवारी 2017 मध्येच भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडले होते. त्यावेळी त्याच्या नावावर कर्णधार म्हणून 199 वनडे सामने होते. पण आता त्याच्या नावावर कर्णधार म्हणून 200 वनडे सामने पूर्ण झाले आहेत.
200 किंवा त्यापेक्षा जास्त वनडे सामन्यात देशाचं नेतृत्व करण्याचा मान यापूर्वी फक्त ऑस्ट्रलियाच्या रिकी पॉन्टिंग आणि न्युझीलँडच्या स्टिफेन फ्लेमिंग यांना मिळाला आहे. रिकी पॉन्टिंगने 230 तर स्टिफेन फ्लेमिंगने 218 वनडे सामन्यांत त्यांच्या देशाचं नेतृत्व केलं आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –