---Advertisement---

फलंदाजीमध्ये 99.94ची जबरदस्त सरासरी असलेल्या ‘डॉन’ला इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजाने दिलेला सर्वाधिक त्रास

On: रविवार, ऑगस्ट 27, 2023 9:09 AM
---Advertisement---

सर डॉन ब्रॅडमन हे नाव माहिती नाही असा क्रिकेटर आणि क्रिकेटप्रेमी शोधून देखील सापडणार. क्रिकेट खेळाला ज्या खेळाडूने ओळख मिळवून दिले ते डॉन ब्रॅडमन. क्रिकेटमधील सर्व विक्रम अनेक वर्षे ब्रॅडमन यांच्याच नावे होते. कदाचित कधीही मोडला जाणार नाही असा सर्वोच्च सरासरीचा (99.94) विश्वविक्रम त्यांच्याच नावे आहे. पण, तुम्हाला माहितेय का, असा कोण गोलंदाज होता ज्याने सर्वाधिक वेळा ब्रॅडमन यांना बाद केले होते? तर चला आज आपण त्या ‘गुमनाम’ खेळाडूविषयी जरा जाणून घेऊ.

ज्याप्रकारे ब्रायन लारा आणि माइक आथरटन हे ग्लेन मॅकग्राचे, ग्रॅहम गुच हे कपिल देव यांचे, ग्रॅमी स्मिथ हा झहीर खानचा “गिऱ्हाईक” होता तसे ब्रॅडमन हे हेडली वेरिटी (Hedley Verity) यांचे नेहमीचे गिऱ्हाईक होत. वेरिटी यांनी ब्रॅडमन यांना सर्वाधिक आठ वेळा बाद केले होते.

हेडली वेरिटी हे 1930 ते 1939 या काळात इंग्लंडसाठी 40 कसोटी सामने खेळले. या चाळीस सामन्यांच्या 73 डावात 24.4च्या सरासरीने 144 बळी त्यांनी मिळवले. एका आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 8 बळी सुद्धा घेतले होते.

हेडली वेरिटी यांनी एका डावात सर्व दहा गडी बाद करण्याचा कारनामा सुद्धा केला आहे. इंग्लिश कौंटीमध्ये यॉर्कशायर संघासाठी खेळताना नॉटिंगहॅमशायर विरूद्ध ही अफलातून कामगिरी केली होती.

वाचनीय लेख-
आठ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, 46 चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---