कठीण परिस्थितीत संघाला सामना जिंकवून देण्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर येणारे नाव म्हणजे केएल राहुल. मग ते आपल्या फलंदाजीने असो किंवा यष्टीरक्षणाने.
सध्याच्या काळात आपल्या कामगिरीच्या बळावर त्याने चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्सचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलचा आज, 18 एप्रिल रोजी 30वा वाढदिवस आहे.
केएल राहुलचा जन्म 1992 मध्ये झाला असून त्याचे पूर्ण नाव कन्नौर लोकेश राहुल आहे. त्याचे वडील डॉ. लोकेश हे एक इंजिनिअर असून आई राजेश्वरी एक प्राध्यापिका आहेत. सध्या राहुलने क्रिकेटजगतात आपले नाव गाजवले आहे. परंतु आपल्याला एकून आश्चर्य वाटले की, त्याचे राहुल हे नाव त्याच्या वडीलांच्या चुकीमुळे पडले आहे.
वडिल विसरले होते राहुलचे नाव
राहुलच्या नामकरण सोहळ्याची कहाणी खूपच मजेदार आहे. राहुलचे वडील हे सुनील गावस्कर यांचे खूप मोठे चाहते होते, त्यामुळे आपल्याही मुलाचे नाव गावस्करांच्या मुलाच्या रोहन नावावरून ठेवायचे असा त्यांचा विचार होता. परंतु नामकरणावेळी राहुलच्या वडीलांना गावस्करांच्या मुलाचे नाव राहुल आहे असे वाटल्याने त्यांनी त्याला राहुल हेच नाव दिले.
आपल्या मुलाला बनवायचे होते इंजिनियर अन्…
राहुलने इंजिनिअर व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. तसाच तो अभ्यासातही चांगला होता. परंतु क्रिकेटची त्याला अधिक आवड असल्याने वयाच्या 11 व्या वर्षीच त्याने क्रिकेटला गंभीरपणे घेण्यास सुरुवात केली. पुढे त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला त्याची ही आवड पुढे नेण्यासाठी नेहमी मदत केली. 2010 मध्ये त्याने कर्नाटक येथून प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती.
दहा वर्षात असी घडवली क्रिकेट कारकिर्द
राहुलने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केल्यानंतर 10 वर्षात खूप मोठे अंतर पार केले आहे. त्यामध्ये त्याच्या नावावरही अनेक विक्रमांच्या नोंदी केल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात षटकार मारून शतक पूर्ण करणारा तो एकमेव फलंदाज आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतक ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
👕 123 internationals
🏏 5072 runs
🔥 12 hundreds, 32 fifties
🥇 First Indian to score a century on debut in men’s ODIsHappy birthday, @klrahul11 🎂 pic.twitter.com/1Jgs9meAvm
— ICC (@ICC) April 18, 2021
त्याने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये, 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये त्याने 43 कसोटी सामन्यांमध्ये 2547 धावा, 42 एकदिवसीय सामन्यात 1634 आणि 56 टी-20 सामन्यात 1831 धावा केल्या आहेत. जगप्रसिद्ध आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार आहे. 2013 साली आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या राहुलने आतापर्यंत 100 सामने खेळताना 3508 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
झेल पकडणं सोडा, साधे प्रयत्नही नाही केले! गुजरातच्या मॅच विनरचा कॅच सोडणाऱ्या दुबेवर भडकला जडेजा
थक गये है..! गुजरातविरुद्ध पराभूत झालेल्या सीएसकेवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, मीम्स व्हायरल