कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय क्रिकेटपटूचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या गोलंदाजीत जास्त वेग नसतानाही त्यांनी भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली होती. या गोलंदाजाने 1983 मध्ये विश्वचषक जिंकण्यासही हातभार लावला होता. कपिल देव यांच्यासमवेत या गोलंदाजाने भारतासाठी अनेक कसोटी सामन्यांमध्ये नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची जबाबदारी स्वीकारली. मदन लाल उधोराम शर्मा असे या गोलंदाजाचे नाव आहे. त्यांचा जन्म 20 मार्च 1951 रोजी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील खेड्यात झाला. त्यांनी भारताकडून 39 कसोटी आणि 67 एकदिवसीय सामने खेळले. या दोन्ही स्वरूपात त्याच्या नावे 144 विकेट आहेत. पण त्याच्या कारकीर्दीतील लक्षणीय क्षण म्हणजे 1983 चा क्रिकेट विश्वचषक.
मदन लाल यांनी 1968-69 पासून प्रथम श्रेणी कारकीर्द सुरू केली. सहा वर्षांनंतर त्यांची निवड भारतीय कसोटी संघात झाली. त्यांनी इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटी सामन्यात पदार्पण करत असताना पहिल्या कसोटी सामन्यात त्याने दोन विकेट्स मिळवल्या. त्यांनी एकूण 39 कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये 71 बळी घेतले. यामध्ये 23 धावा देऊन 5 बळी मिळवणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. 1984-85 सालामध्ये मदन लाल संघातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांची कसोटी कारकीर्द पूर्ण झाली असे सर्वांना वाटले. पण जेव्हा 1986 सालामध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्यावर गेला तेव्हा मदन लाल पुन्हा संघात परतले. त्याने हेडिंग्ले कसोटी खेळली. यात त्यांनी 18 धावा देऊन तीन बळी घेतले. हा कसोटी सामना भारताने जिंकला होता. ते एक उत्कृष्ठ गोलंदाजाबरोबर उत्कृष्ठ फलंदाजही होते. त्यांनी कसोटीत 1042 धावा केल्या. त्यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
विश्वचषक अंतिम सामन्यात मदनलाल यांनी फासा पलटवला
एकदिवसीय क्रिकेटमध्ये मदन लाल अधिक प्रभावी होते. यामध्ये त्यांनी 67 सामने खेळताना 73 गडी बाद केले. 20 धावा देऊन चार बळी मिळवणे ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. 1983 च्या विश्वचषकात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात त्यांनी 31 धावा देत तीन बळी घेऊन वेस्ट इंडिजचा कणा मोडला होता. यासह भारताने 183 धावांचे लक्ष्याचा बचाव केला होता. या सामन्यात त्यांनी व्हिव्हियन रिचर्ड्सची विकेटही घेतली. कपिल देवच्या झेलसाठी या विकेटची अजून आठवण येते. रिचर्ड्स बाद झाल्यानंतर मदन लाल एकदा म्हणाले होते की, त्यांनी या सामन्यात गोलंदाजीसाठी कपिल देव कडून चेंडू हिसकावून घेतला होता.
ते म्हणाले होते, ‘वास्तविक, मला त्यांची विकेट घ्यायची होती. तीन षटकांत 21 धावा दिल्यानंतर कोणताही कर्णधार मला चेंडू द्यायचा की नाही याचा विचार करेल. पण मी गेलो आणि कपिल देवकडून चेंडू घेतला. मी आणखी काही सेकंद जर गेलो नसतो तर दुसऱ्या कोणाला तरी गोलंदाजी करण्यास सांगितले असते. पण मी याची विकेट घेणार हा माझा आत्मविश्वास होता आणि त्यानंतरची कहाणी इतिहासात नोंदवली गेली.’
मदन लाल पुढे म्हणाले, जर रिचर्ड्स अजूनही कोठेही भेटले, तरी ते म्हणतात – अहो, मला तुमचा चेहरा पाहायचा नाही. पण ते हे फक्त मजेने म्हणतात. ते एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आहे. पण तरीही तो सामना अविस्मरणीय आहे. यानंतर आमच्या कुटुंबाचे जीवन बदलले. आमचे कुटुंब गावात खूप नामांकित झाले. वडील कोठेही जायचे तेव्हा लोक त्यांना खुर्ची देत असत.’
मदन लाल यांनी त्यांच्या कारकिर्दीतील 1987 साली पाकिस्तानविरुद्ध हैदराबाद येथे खेळलेला वनडे सामना शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् ‘त्या’ चिमणीला लॉर्ड्स संग्रहालयात मिळाली जागा, वाचा काय आहे कहाणी
मराठीत माहिती – क्रिकेटर मदनलाल शर्मा