---Advertisement---

‘मदीपा’चा बदला! जेव्हा मदन लालने सर विवियन रिचर्ड्सला दिले होते चोख प्रत्युत्तर, वाचा तो किस्सा

Kapil-Dev-Madan-Lal
---Advertisement---

काही दिवसांपूर्वीच कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने जिंकलेल्या १९८३ विश्वचषकावर आधारित ‘८३’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने हुबेहूब कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. ज्यामुळे हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, रणवीर सिंगदेखील या चित्रपटातील काही सीन आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहे. नुकताच त्याने मदन लाल यांच्या किस्स्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

रणवीर सिंग सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. त्याचे कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. सध्या तो ‘८३’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाचे व्हिडिओ तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देखील शेअर करत आहे. नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मदन लाल यांनी सर विवियन रिचर्ड्स यांचा कसा काटा काढला होता. हा किस्सा सांगितला आहे. या व्हिडिओला रणवीरने ‘मदीपाच्या बदल्याची पडद्यामागील गोष्ट’

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कपिल देव आणि मदन लाल १९८३ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील किस्सा सांगताना दिसून येत आहेत. त्यावेळी भारतीय संघाचा सामना बलाढ्य वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झाला होता. त्यावेळी मदन लाल गोलंदाजी करत असताना सर विवियन रिचर्ड्स यांनी एकाच षटकात २ – ३ चौकार मारले होते. त्यामुळे कपिल देव यांनी त्यांना २ षटक थांबून गोलंदाजी करण्यास सांगितले होते.

परंतु, मदन लाल यांनी कपिल देवला गोलंदाजी देण्याची विनंती केली होती. १९८३ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात मदन लाल यांनीच सर विवियन रिचर्ड्सला बाद केले होते. रिचर्ड्स यांचा झेल कपिल देव यांनी घेतला होता. हा एक चित्रपटातील सीन आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग कपिल देवची भूमिका पार पडतोय. तर हार्डी संधूने मदनलाल यांची भूमिका साकारली आहे.

https://www.instagram.com/tv/CXcsLZWIVZD/?utm_medium=copy_link

हा चित्रपट भारतीय संघाने १९८३ विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता, त्या गोष्टीवर आधारित आहे. हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच या रणवीर सिंगचा अभिनय पाहण्यासाठी चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

काळजाचा थरकाप उडवणारे ‘या’ दोनच कसोटी सुटल्या बरोबरीत; एकात भारतीय संघाचाही समावेश

विराट आणि रोहित दक्षिण आफ्रिकेत जाऊनही एकत्र खेळणार नाही? नक्की काय आहे कारण, वाचा

काय सांगता! आजच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना ‘टाय’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---