क्रिकेटटॉप बातम्या

तेंडुलकरपर्यंत पोहचली पायाने वाईड देण्याऱ्या पंचाची ख्याती; मास्टर-ब्लास्टर म्हणतोय…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज पंच होऊन गेले, जे आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध होते. खेळाडूला बाद घोषित करण्याची आणि वाइड चेंडू सांगण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते. यामध्ये सर्वात गाजलेलं नाव म्हणजे प्रसिद्ध पंच बिली बाऊडेन. ते आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध होते. परंतु, महाराष्ट्रात देखील त्यांना टक्कर देणारा एक पंच आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडिओ शेअर करत बिली बाऊडेनला प्रश्न केला आहे. (Sachin Tendulkar shared viral umpire video)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट स्पर्धेतील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये पंच हाताने नव्हे, तर चक्क पायाने वाईड चेंडूचा कॉल देताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पुरंदर प्रीमियर लीग स्पर्धेतील आहे.

हा व्हिडिओ गेल्या कित्येक दिवसांपासून वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत पोहोचला आहे. सचिनला देखील ही हटके पंचगिरी आवडली, त्याने क्षण ही वाया न घालवता हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत त्याने आंतरराष्ट्रीय पंच बिली बाऊडनला टॅग केले आहे. यासह त्याने बिली बाऊडनला हा व्हिडिओ पाहून तुमचं मत काय? असा प्रश्न देखील विचारला आहे.

https://twitter.com/sachin_rt/status/1470366195048013831?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1470366195048013831%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-sachin-tendulkar-refers-to-new-zealand-billy-bowden-while-sharing-viral-video-of-umpire-signalling-wide-5319216.html

मायकल वॉनने देखील शेअर केला होता व्हिडिओ 
सचिन तेंडुलकरपूर्वी हा व्हिडिओ मायकल वॉनने देखील शेअर केला होता. तसेच मायकल वॉनने कॅप्शन म्हणून लिहिले होते की, “नक्कीच या पंचांना आयसीसीच्या एलीट पॅनेलमध्ये संधी दिली गेली पाहिजे.”

या पंचांनी या संपूर्ण स्पर्धेत आपल्या आगळ्या वेगळ्या पंचगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या :

विराट आणि रोहित दक्षिण आफ्रिकेत जाऊनही एकत्र खेळणार नाही? नक्की काय आहे कारण, वाचा

‘या’ पाकिस्तानी फलंदाजाची बॅट ओकतेय आग! विराट-रोहितलाही न जमलेला विश्वविक्रम केलाय नावावर

कोहलीवर ट्विटर युजर्स मेहेरबान! धोनीबद्दल विराटने केलेलं ‘हे’ ट्वीट सर्वाधिकवेळा लाईक अन् रिट्वीट

Related Articles